Vivo ने भारतात लाँच केले नवीन अप्रतिम स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स

Vivo ने भारतात लाँच केले नवीन अप्रतिम स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स
HIGHLIGHTS

Vivo T2 आणि Vivo T2x अखेर भारतात लाँच

Vivo T2 फोन मिड रेंज किमतीत लाँच

Vivo T2x हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

VIVOने नुकतेच Vivo T2 आणि Vivo T2x अखेर भारतात लाँच केले आहेत. कंपनीचा Vivo T2 हा फोन मिड रेंज किमतीत लाँच करण्यात आला आहे. तर, Vivo T2x हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट आणि VIVO कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून खरेदी केले जाऊ शकतात. काही ऑफर्ससह हे दोन्ही 5G स्मार्टफोन्स परवडणाऱ्या दरात खरेदी करता येईल. 

Vivo T2 आणि Vivo T2x ची किमंत 

Vivo T2 ची सुरुवातीची किमंत 18,999 रुपये आहे. यासह फ्लिपकार्ट यावर 1,500 रुपयांचा थेट डिस्काउंट देत आहे. हा स्मार्टफोन व्हेलॉसिटी वेव्ह आणि निट्रो ब्लेज कलरमध्ये खरेदी करता येईल. तसेच, Vivo T2x ची किमंत 12,999 रुपयांपासून सुरु होते. यासह, तुम्हाला 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. फोन मरीन ब्लु, गोल्ड आणि ग्लिटर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. 

 Vivo T2 चे स्पेसिफिकेशन्स 

 Vivo T2 स्मार्टफोनमध्ये फुल HD+ टर्बो अमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोनमध्ये Snapdragon 695 SoC प्रोसेसर दिला गेला आहे. तसेच, फोन 6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंटमध्ये येतो. दोन्ही व्हेरिएंटसह 128GB स्टोरेज मिळेल, जी मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येणार आहे. 

त्याबरोबरच, या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W टर्बो फास्ट चार्जिंग समर्थनासह येईल. यामध्ये 64MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 2MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फीसाठी 16MPचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 

 Vivo T2x चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo T2x  स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच लांबी फुल HD + LCD डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड Funtouch ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 6020 SoC चिपसेट दिली आहे. तसेच, फोन 4GB, 6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंटमध्ये येतो. तिन्ही व्हेरिएंटसह 128GB स्टोरेज मिळेल, जी मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येणार आहे. 

त्याबरोबरच, या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंग समर्थनासह येईल. यात 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 2MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo