Vivo ने मागील आठवड्यात Vivo T2 आणि Vivo T2x हे नवीनतम फोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन बजेट किमतीत सादर करण्यात आले होते. Vivo T2च्या या फोनची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. कंपनीची ही सिरीज Vivo T1 5G सिरीजची अपग्रेडेड सिरीज आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात-
या फोनची विक्री आज दुपारी 12 वाजतापासून सुरु झालेली आहे. हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवरून अप्रतिम ऑफर्ससह आज खरेदी करता येणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये आहे. मात्र पहिल्या सेलमध्ये तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करता येईल.
पहिल्या सेलमध्ये या फोनवर तुम्हाला पूर्ण 6,500 रुपयांची बचत करता येणार आहे. याशिवाय, अनेक बँकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 1,500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. फोन नाइट्रो ब्लु आणि व्हेलॉसिटी वेब पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
Vivo च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.38-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 बजेट 5G प्रोसेसर आहे. याशिवाय, फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे. तुम्हाला स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येणार आहे. हे डिवाइस Android 13 वर आधारित FuntouchOS वर काम करते.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 44W USB टाइप C फास्ट चार्जिंग फीचर मिळेल. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा मिळेल आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये समोरील बाजूस 16MP कॅमेरा आहे.