मस्तच ! Vivo चा ‘हा’ 5G फोन आता एका नव्या रंगात लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि स्पेक्स

Updated on 21-Sep-2022
HIGHLIGHTS

Vivo T1 5G चा नवीन कलर ऑप्शन लाँच

Vivo T1 5G च्या नवीन व्हेरियंटचे तपशील रेग्युलर व्हेरियंट सारखेच आहेत.

Vivo T1 5G आता सिल्की व्हाईट पेंट जॉबमध्ये उपलब्ध आहे

Vivo ने भारतात आपल्या T1 5G चे नवीन कलर व्हेरियंट जाहीर केले आहे. हे उपकरण यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी कलरमध्ये लाँच करण्यात आले होते. Vivo T1 5G आता सिल्की व्हाईट पेंट जॉबमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया Vivo T1 5G बद्दल सविस्तर तपशील…

हे सुद्धा वाचा : Twitter यूजर्ससाठी खुशखबर! ट्विट एडिट करण्याचे टेन्शन संपले आहे, 'EDIT' बटण लाँच

Vivo T1 5G एका खास फेस्टिव्ह एडिशनमध्ये म्हणजेच सिल्की व्हाइट कलर पर्यायामध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचे स्पेक्स नेहमीच्या फोनसारखेच आहेत. Vivo T1 (T1) 5G (5G) ला 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंच फुल HD + IPS LCD दिले जात आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे.

 

https://twitter.com/Vivo_India/status/1571734792017944576?ref_src=twsrc%5Etfw

 

फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला 5G (5G), 4G LTE, Dual Band Wi-Fi, Bluetooth 5.1, USB Type-C आणि USB OTG सारखे पर्याय मिळतील. OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह दोन 2-मेगापिक्सल कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोन 6GB रॅम आणि 8GB रॅम व्हेरिएंमध्ये सुपर नाईट मोड आणि मल्टी-स्टाईल पोर्ट्रेट मोड फिचर देखील ऑफर करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :