digit zero1 awards

 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo S18, S18 Pro S18e फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि अनेक अप्रतिम Features। Tech  News 

 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo S18, S18 Pro S18e फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि अनेक अप्रतिम Features। Tech  News 
HIGHLIGHTS

Vivo S18 सिरीज अंतर्गत Vivo S18, S18 Pro आणि S18e फोन लाँच

या फोनची डिझाईन आणि लुक खूपच अनोखे आणि स्टायलिश आहे.

दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा आहे

Vivo S18 सिरीज लाँच झाली आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत Vivo S18, S18 Pro आणि S18e हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. गेल्या काही काळापासून Vivo च्या या लेटेस्ट सीरिजच्या लाँचची चर्चा सुरु होती. त्यानंतर, अखेर ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स अप्रतिम आहेत. या फोनची डिझाईन आणि लुक खूपच अनोखे आणि स्टायलिश आहे. तसेच, फोनचा कॅमेरा सेक्शन देखील आकर्षक आहे. चला जाणून घेऊयात सर्व तपशील आणि किंमत.

हे सुद्धा वाचा: Realme C67 5G स्मार्टफोन भारतात शानदार फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Vivo S18 सिरीजची किंमत

कंपनीने Vivo S18 फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2,299 म्हणजेच अंदाजे 22,350 रुपये आहे. तसेच, प्रो व्हेरिएंटच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 3,199 म्हणजेच अंदाजे 38,100 रुपये आहे. तर, Vivo S18e फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,099 युआन म्हणजेच अंदाजे 24,530 रुपये इतकी आहे.

vivo-S18-Features

Vivo S18 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo S18 च्या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व OLED फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Vivo S18 Pro

Vivo S18 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व OLED फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz चा आहे. तर, हा फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात स्टोरेजसाठी 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज दिले जाऊ शकते. तर, फोटोग्राफीसाठी यात 50MP Sony IMX920 प्रायमरी कॅमेरा 50MP Samsung JNI अल्ट्रा अल्ट्रा सेन्सर आणि 12MP IMX663 टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, स्पेसिफिकेशन्स वरील फोनप्रमाणेच आहेत.

vivo-S18e-Features

Vivo S18e

Vivo S18e मध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व OLED फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. लक्षात घ्या की, हा फोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4800mAh ची बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo