Interesting! Vivo S18 सिरीजची लॉन्चिंग कन्फर्म, लवकरच AI तंत्रज्ञानासह टेक विश्वात होणार दाखल। Tech News
Vivo ने आगामी Vivo S18 सीरीजच्या लाँचची पुष्टी केली आहे.
सीरीज अंतर्गत, Vivo S18 आणि Vivo S18 Pro भारतीय बाजारात लाँच करण्यात येतील.
हा मोबाइल फोन ब्लू हार्ट AI तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल, असे देखील समोर आले आहे.
Vivo ची आगामी Vivo S18 सीरीज गेल्या अनेक दिवसांपासून लाँच संदर्भात चर्चेत आहे. आता अखेर Vivo ने या स्मार्टफोन सीरीजच्या लाँचची पुष्टी केली आहे. या सिरीजशी संबंधित एक टीझर फोटो देखील जारी करण्यात आला आहे. या इमेजमध्ये आगामी स्मार्टफोनशी संबंधित तपशील देण्यात आला आहे. मात्र, या अधिकृत टीझरवरून स्मार्टफोन सीरिजची किंमत किंवा स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती जाहीर झालेली नाही.
Vivo ने सध्या केवळ Vivo S18 सिरीज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. परंतु लाँच तारीख जाहीर केलेली नाही. ही लाइनअप डिसेंबरमध्ये लाँच करण्यात येईल, असे मानले जात आहे.
Vivo S18 सीरीज
Vivo S18 सीरीज अंतर्गत, Vivo S18 आणि Vivo S18 Pro भारतीय बाजारात लाँच केले जाऊ शकतात. कंपनीने जारी केलेला टीझर पाहता हा मोबाइल फोन ब्लू हार्ट AI तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. जो काही काळापूर्वी लाँच झालेल्या Vivo X100 सिरीज वापरला गेला होता. कंपनीचा दावा आहे की, या टेक्नॉलॉजीमुळे फोन्सचा परफॉर्मन्स अनेक पटींनी वाढेल.
प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर Vivo S18 सीरीजचा फर्स्ट लुक जारी केला आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर सिरीजचा फर्स्ट लुक बघू शकता.
Vivo S18 सीरिजचे अपेक्षित तपशील
अलीकडेच पुढे आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, Vivo S18 स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर प्रदान केला जाईल. तर, Vivo S18 Pro मध्ये MediaTek Dimensity 9200+ चिपसेट उपलब्ध असेल. त्याबरोबरच, दोन्ही फोन 16GB रॅम आणि 512GB इंटर्नल स्टोरेजसह ऑफर केले जाऊ शकतात. या सिरीजचे दोन्ही स्मार्टफोन्स OLED डिस्प्लेने सुसज्ज असतील. दोन्ही फोनमध्ये 5000mAh पर्यंतची बॅटरी दिली जाऊ शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile