Vivo ने आपल्या Vivo S17 सीरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सिरीजअंतर्गत कंपनीने Vivo S17, Vivo S17t आणि Vivo S17 Pro हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo S17 आणि S17t स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स जवळपास समान आहेत. आम्ही तुम्हाला दोन्ही नवीनतम Vivo स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स सांगणार आहोत. स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केले जातील, अशी अपेक्षा आहे.
Vivo S17 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,499 युआन म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 2,799 युआन म्हणजेच सुमारे 32,500 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,999 युआन म्हणेजच सुमारे 35,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन ब्लू, पिंक आणि ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Vivo ने S17T ची किंमत, उपलब्धता आणि रॅम आणि स्टोरेज वेरिएंटबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही.
नव्या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व-एज AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G Plus चिपसेट मिळेल. यासह 12GB पर्यंत रॅम आणि 256GB आणि 512GB इनबिल्ट स्टोरेज आहे. डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
फोनला पॉवर करण्यासाठी, 4505mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते.
विशेष गोष्ट म्हणजे Vivo S17 स्मार्टफोनमध्ये 50MP चा Samsung JN1 सेल्फी कॅमेरा आहे, जो ड्युअल सॉफ्ट LED फ्लॅशसह येतो. तसेच, फोन OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल Samsung GN5 प्राइमरी, 8-मेगापिक्सेल Sony IMX355 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि रिंग LED फ्लॅश मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo S17 च्या पुढील आणि मागील कॅमेर्यांसह 4K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.