बऱ्याच टेक कंपन्या आता 5G आणि लोकांच्या बजेटमध्ये येणारे नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल करत आहेत. त्यामध्ये आता आणखी एक नाव जुळलं आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने अलीकडेच Vivo Y30 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनचे डिझाईन आणि कलर अतिशय आकर्षक आहेत. या स्मार्टफोनचे फीचर्स देखील त्याला खूप खास बनवतात. चला जाणून घेऊया Vivo Y30 5G मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, त्याची किंमत आणि उपलब्धता…
हे सुद्धा वाचा : AIRTEL चे 3 जबरदस्त प्लॅन ! 200 रुपयांपेक्षा स्वस्त, महिन्याभराच्या वैधतेसह मिळेल 21 GB डेटा
Vivo Y30 5G मध्ये, तुम्हाला 6.51-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले, 720 x 1600 पिक्सेलचा HD + रिझोल्यूशन आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो दिला जात आहे. फेस अनलॉक फिचरसह, हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि डायमेंसिटी 700 चिपसेट प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 2GB एक्सपांडेबल रॅम मिळेल. बॅटरीसोबत 10W चार्जिंग सपोर्ट दिला जात आहे.
याव्यतिरिक्त, फोनचा फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. यात 50MP मुख्य सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. USB टाइप-C पोर्ट, Wi-Fi आणि ब्लूटूथ सेवांसह, हा फोन अनेक फीचर्ससह सुसज्ज आहे.
Vivo चा हा स्मार्टफोन एक 5G मोबाईल फोन आहे. तुम्हाला त्यामध्ये 128GB पर्यंत स्टोरेज दिले जात आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत $237 म्हणजेच अंदाजे 18,923 रुपये आहे. तुम्ही Vivo Y30 5G स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी या दोन केले ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. हा फोन थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि सध्या तेथे खरेदीसाठी उपलब्ध आहे.