Vivo T1x आज म्हणजेच 20 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनी आधीच सोशल मीडिया चॅनेलवर T1x स्मार्टफोनची टीज करत आहे. जो सूचित करतो की, फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आणि सेगमेंट-फर्स्ट 4-लेयर कूलिंग टेक्नॉलॉजीसह येणार आहे. हा ब्रँडच्या T-Series मधील एक ऑनलाइन विशेष फोन आहे. फोनची डिझाईन इतर T-सिरीज फोन्स प्रमाणेच आहे. आता, लाँच आधी फोनचे फीचर्स आणि किंमत ऑनलाइन समोर आले आहेत.
हे सुद्धा वाचा : महत्त्वाची माहिती ! घरबसल्या 'या' ऍपद्वारे Aadhar मध्ये नाव आणि पत्ता बदला, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
Vivo T1x फोन 5000mAh बॅटरी, एक्सपेंडेबल रॅम आणि दोन कलर ऑप्शन्ससह येईल. ही एक बजेट ऑफर असेल आणि त्याची किंमत बजेट सेगमेंटमध्ये असावी. Vivo ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर टीज केल्याप्रमाणे हँडसेट दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.
अफवांनुसार, Vivo T1x मध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. यात 2408×1080 रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच फुल HD + LCD स्क्रीन आहे. फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. Vivo T1x मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, सेकंडरी 2MP सेन्सर आणि तिसरा 2MP कॅमेरा आहे. फ्रंटला आकर्षक सेल्फीसाठी 8MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
Vivo T1x च्या 4GB + 64GB स्टोरेजची भारतात किंमत 11,499 रुपये ठेवली जाऊ शकते. Tipster PassionGeekz च्या ट्विटनुसार, हे ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. दरम्यान, फोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट सुमारे 14,400 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.