23 मार्चला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो Vivo V9 स्मार्टफोन

Updated on 15-Mar-2018
HIGHLIGHTS

Vivo इंडिया ने या स्मार्टफोन च्या लॉन्च बद्दल आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली.

Vivo इंडिया ने मंगळवारी या गोष्टीचा खुलासा केला की ते भारतात 23 मार्चला होणार्‍या आपल्या एका इवेंट मधुन आपल्या Vivo V9 स्मार्टफोनला लॉन्च करेल. याआधी असा अंदाज लावला जात होता कि हा इवेंट 27 मार्चला होईल. 

पण अजूनपर्यंत कंपनी कडून त्या फोन बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही जो या इवेंट मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. पण एवढे मात्र नक्की की कंपनी च्या आगामी फोन मध्ये एक ड्यूअल कॅमेरा सेटअप आणि एक बेजल लेस डिस्प्ले असणारा आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये iPhone X प्रमाणे एक नॉच पण असेल. यावरून असे वाटत आहे की कंपनी या लॉन्च इवेंट मध्ये आपल्या Vivo V9 स्मार्टफोन ला लॉन्च करेल. तसेच या स्मार्टफोन च्या बाबतीत ईतर देशातील काही टीजर पण या गोष्टीची पुष्टि करतात की हा अशाच काही फीचर्स सह भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो आणि आता कंपनी कडून पण याची पुष्टि झाली आहे. 

वर सांगितल्या प्रमाणे कंपनी ने याचा खुलासा केला आहे आणि तोही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून. या ट्विट मध्ये कंपनी ने असे म्हटले आहे की ते आपल्या या स्मार्टफोन ला पुढच्या आठवड्यात लॉन्च करणार आहेत. भारत सोडून या स्मार्टफोनला आता पर्यंत ईतर देशात लॉन्च केले गेले नाही. 

जरी कंपनी ने या स्मार्टफोन चा खुलासा केला असला तरी या फोन बद्दल जास्त माहिती समोर आली नाही, याचे स्पेक्स, फीचर्स आणि किंमत यावरुन कंपनी ने अजून पडदा हटवला नाही. पण इंडोनेशिया च्या एका ई-कॉमर्स पोर्टल नुसार हा स्मार्टफोन IDR 4,999,000 म्हणजे जवळपास Rs. 23,700 मध्ये लाँच होऊ शकतो. 
 
याव्यतिरिक्त या लिस्टिंग नुसार या यह स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 660, 4GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप पण मिळू शकतो, जो 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल च्या दो सेंसर चे मिश्रण आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :