Vivo ने बजेट फोन Vivo Y33e 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo Y33s 5G ची किंचित टोन्ड डाउन आवृत्ती आहे, जो या वर्षी मार्चमध्ये लाँच झाला होता. Y33 सिरीजमधील हा तिसरा स्मार्टफोन आहे. कारण कंपनी आधीच Vivo Y33s आणि Vivo Y33T ऑफर करत आहे. Vivo Y33e 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच यात MediaTek चिपसेट देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स…
Vivo Y33e 5G मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.51-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले येतो. स्मार्टफोनची स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह येते. हा 5G हँडसेट 4GB पर्यंत RAM सह जोडलेल्या ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 चिपसेटद्वारे समर्थित आहे. Vivo Y33e 5G मध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज आहे.
हे सुद्धा वाचा: WFH साठी VIचे तीन जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स, 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध
Vivo चा बजेट स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Vivo Y33e 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 13MPचा मुख्य सेन्सर आणि 2MP दुय्यम सेन्सर आहे. तसेच, यात आकर्षक सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo ने नुकतेच Vivo Y33e 5G चीनमध्ये लाँच केले आहे. तेथे त्याची किंमत 1,299 युआन म्हणजेच सुमारे 15,000 आहे. हा स्मार्टफोन फ्लोराईट ब्लॅक आणि मॅजिक ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
फोनमध्ये कंपनीच्या वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह 6.58-इंचा लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले आहे. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये कंपनीने MediaTek Dimensity 700 चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याव्यतिरिक्त, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.