आतापर्यंत तुम्ही फक्त 150W पर्यंत फास्ट चार्जिंग असलेले फोन वापरत आहात, पण लवकरच तुमच्या हातात 200W चार्जिंग असलेला फोन येणार आहे. असे वृत्त आहे की, Vivo एका स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्यामध्ये 200W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. यापूर्वी अशी बातमी आली होती की, Vivo 100W फास्ट चार्जिंग असलेल्या फोनवर काम करत आहे. या चार्जरबद्दल, असेही सांगितले जात आहे की 200W चार्जिंग असलेले ऍडॉप्टर 120W, 80W आणि 66W पॉवरसोबत काम करेल.
एका चायनीज टीपस्टरने Weibo वर Vivo च्या या चार्जरबद्दल माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने 100W चार्जरचा प्लान रद्द केला आहे आणि आता 200W चार्जरवर काम करत आहे. नवीन चार्जरसह, 20V पॉवर उपलब्ध होईल, जे 200W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. या चार्जरसह येणाऱ्या फोनमध्ये 4000mAh बॅटरी मिळेल.
हे सुद्धा वाचा: BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मोफत SMS, बघा किंमत
जरी विवो कंपनीने अद्याप आपल्या 200W फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानाबद्दल जास्त माहिती दिली नाही. परंतु असे मानले जाते की, कंपनीकडून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात असे अनेक स्मार्टफोन आहेत जे उच्च चार्जिंग स्पीडला सपोर्ट करतात. यांमध्ये 30W ते 150W पर्यंत चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र, या क्षणी कोणताही स्मार्टफोन ब्रँड 200W जलद चार्जिंग ऑफर करत नाही.
Vivo ने अलीकडेच फ्लॅगशिप फोन Vivo X80 Pro लाँच केला आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह चार रियर कॅमेरे आहेत. या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4700mAh ची बॅटरी आहे. फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 50 मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स चार रियर कॅमेऱ्यांमध्ये आहे आणि दुसरी लेन्स 48 मेगापिक्सेलची आहे. इतर दोन लेन्स 12 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सल्सच्या आहेत.