Vivo Ganesh Chaturthi Offer : तीन आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, पहा यादी

Vivo Ganesh Chaturthi Offer : तीन आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, पहा यादी
HIGHLIGHTS

Vivo Ganesh Chaturthi Offer सुरु

Vivo Ganesh Chaturthi Offer 30 सप्टेंबरपर्यंत वैध

VIVO चे तीन आकर्षक फोन सवलतीसह उपलब्ध

तुमचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Vivo चे तीन पावरफुल स्मार्टफोन सध्या बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. खरं तर, Vivo ने भारतातील काही फ्लॅगशिप हँडसेटवर काही कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत. कॅशबॅक ऑफर अंतर्गत उपलब्ध स्मार्टफोनमध्ये Vivo V25 Pro, Vivo Y75 आणि Vivo X80 Series यांचा समावेश आहे ज्यात Vivo X80 आणि Vivo X80 Pro यांचा समावेश आहे. कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या ऑफर जाहीर केल्या आहेत आणि या कॅशबॅक ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहेत. 

हे सुद्धा वाचा : Apple Watch Series 3 लवकरच होणार बंद, अनेक ठिकाणी आउट ऑफ स्टॉक

Vivo V25 Pro

Vivo V25 Pro भारतात 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि SBI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे या स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीदारांना आता 3,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. स्मार्टफोनच्या मुख्य फीचर्समध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP Eye AF सेल्फी कॅमेरा आणि 66W फ्लॅश चार्ज टेकनॉलॉजीसाठी समर्थन समाविष्ट आहे.

Vivo X80 सिरीज 

या सिरीजमधील Vivo X80 ची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये आहे. आता हा फोन HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 3,500 रुपयांच्या कॅशबॅकवर उपलब्ध आहे. दुसरीकडे, Vivo X80 Pro आता 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.

Vivo Y35

 Vivo ने अलीकडेच Vivo Y35 भारतात 18,499 रुपयांच्या किमतीत लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि SBI बँक ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 1,000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध असेल. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo