Vivo चा उत्तम एंट्री लेव्हल फोन लवकरच होणार लाँच, आकर्षक लुकसह मिळतील जबरदस्त फीचर्स

Updated on 26-Jul-2022
HIGHLIGHTS

Vivo Y02s स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

नव्या स्मार्टफोनची किंमत सुमारे 9 हजार रुपये

जाणून घ्या, स्मार्टफोनचे जबरदस्त फिचर आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo सध्या त्यांच्या Y सिरीजच्या नवीन एंट्री लेव्हल Vivo Y02s स्मार्टफोनवर काम करत आहे. फोनच्या लाँच  डेटबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका टिपस्टरने या आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक महत्त्वाच्या माहितीसह हँडसेटचे ऑफिशियल रेंडर शेअर केले आहेत. Vivo चा हा एंट्री लेव्हल फोन सेगमेंटमध्ये उत्कृष्ट डिझाइन आणि प्रीमियम लुक देणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा : Jio recharge plan : 999 रुपयांमध्ये अमर्यादित कॉल '700GB पर्यंत' डेटा, मोफत Netflix, प्राइम व्हिडिओ आणि Hotstar

अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 टिपस्टरनुसार, कंपनी या फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51 इंच HD + IPS LCD पॅनेल देणार आहे. फोनमध्ये मिळणाऱ्या या डिस्प्लेची डिझाईन वॉटरड्रॉप नॉच असेल. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह येईल. प्रोसेसर म्हणून तुम्हाला त्यात MediaTek Helio G35 चिपसेट पाहायला मिळेल.

फोटोग्राफीसाठी कंपनी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह सिंगल कॅमेरा देणार आहे. हा कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाईल. कंपनीने फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल की नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

कंपनी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देणार आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाले तर लीक नुसार हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS12 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, USB टाइप-C पोर्ट आणि ड्युअल सिम सपोर्टसह 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील.

अपेक्षित किंमत :

 हा फोन फ्लोराईट ब्लॅक आणि व्हायब्रंट ब्लू कलर ऑप्शनमध्ये येईल. त्याची किंमत $113 म्हणजेच सुमारे 9 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत फोन आशियातील काही बाजारपेठांमध्ये लाँच होऊ शकतो. 
 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :