Vivo ने देखील सणानिमित्त दिवाळी सेलचे आयोजन केले आहे.
तुम्ही Vivo X90 सिरीज खरेदी केल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल.
Vivo V29 सीरिजवर 4,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
सणासुदीच्या हंगामात अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय प्रोडक्ट्सवर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. त्या यादीत आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo चे नाव देखील समाविष्ट झाले आहे. होय, Vivo ने देखील सणानिमित्त दिवाळी सेलचे आयोजन केले आहे. ज्या अंतर्गत अनेक स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ही ऑफर 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 15 नोव्हेंबरपर्यंत लाइव्ह असणार आहे. लक्षात घ्या की, दिवाळी सेल अंतगर्त Vivo X90 सिरीज, Vivo V29 सिरीज आणि Vivo Y सिरीज यांचा समावेश आहे. या सिरीजवर तुम्हाला प्रचंड डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळेल. वाचा सविस्तर-
हे सर्व स्मार्टफोन सर्वोत्कृष्ट कॅमेरा, स्लीक डिझाइन आणि स्मूथ परफॉर्मन्सने सुसज्ज आहेत. हे फोन तुमच्या बजेटमध्ये बंपर डिस्काउंटसह उपलब्ध करून दिले जात आहेत. हे फोन सर्व भागीदार रिटेल स्टोअर्स आणि मेनलाइन स्टोअर्समधून प्राईस कटसह खरेदी केले जाऊ शकतात.
Vivo X90 सिरीजवरील ऑफर्स
तुम्ही Vivo X90 सिरीज खरेदी केल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. यासह, V-Shield प्लॅनवर 40% पर्यंत सूट दिली जाईल.
Vivo V29 सिरीजवरील ऑफर्स
Vivo V29 सीरिजवर 4,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर ICICI, SBI, HSBC, येस बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक आणि वनकार्डवर उपलब्ध आहे.
त्याबरोबरच, कंपनीची नवीनतम X आणि V सिरीज 101 रुपयांची EMI भरून खरेदी केली जाऊ शकते. त्याबरोबरच, जुने Vivo स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जाईल.
Vivo Y सिरीजवरील ऑफर्स
Vivo Y200 5G वर 2,500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. तर, Vivo Y56 आणि Y27 वर 1,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.
ही ऑफर ICICI, SBI, Kotak Mahindra, OneCard आणि AU Small Finance सह दिली जाईल. वर सांगितल्याप्रमाणे, या सिरीजमधील फोन देखील 101 रुपयांची सुरुवातीची किंमत देऊन खरेदी करता येतील.
Vivo Y200 5G आणि Y56 सह V-Shield प्लॅन खरेदी केल्यास 40% पर्यंत सूट दिली जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.