यावर्षी झालेल्या MWC मध्ये आपण अनेक मजेदार गोष्टी बघितल्या आहेत, पण इतर कोणी Vivo Apex कॉन्सेप्ट इतकी प्रसिद्धि मिळवली नाही. या डिवाइस वर सर्वांचीच नजर होती. हा सर्वांच्या नजरेत भरलेला हा कॉन्सेप्ट प्रत्यक्षात येण्याची बातमी येत आहे.
GSMArena चा एक रिपोर्ट पाहता वीवो चा हा फोन 12 जून ला शांघाई मध्ये होणार्या एका इवेंट मध्ये सादर केला जाणार आहे, या डिवाइस च्या लॉन्च साठी कंपनी ने मीडिया ला निमंत्रण देणे पण सुरु केले आहे. हे इनवाइट पाहून असे म्हणू शकतो की लवकरच हा डिवाइस लॉन्च होणे निश्चित झाले आहे.
या डिवाइस च्या लॉन्च ची तारीख पण तीच आहे, जी MWC मध्ये ठरविण्यात आली होती. असेही होऊ शकते की हा डिवाइस इतर कोणत्यातरी नावाने लॉन्च केला जाईल, पण अधिकृतपणे अजूनतरी असे काही समोर आले नाही.
या फोन मध्ये कंपनी चा "हाफ-स्क्रीन" फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, पण हा डिस्प्ले च्या एक तृतियांश पेक्षा जास्त भागावर वापरता येतो. हा एक-बेजेल स्मार्टफोन आहे. यात 5.99-इंचाचा OLED डिस्प्ले COF टेक्नोलॉजी सह देण्यात आला आहे. कंपनी ने यात स्क्रीन साउंड कास्टिंग टेक्नोलॉजी पण दिली आहे.
कंपनी ने आपला कॉन्सेप्ट स्मार्टफोन Vivo Apex काही दिवसांपूर्वी आयोजित मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये सादर केला होता. या डिवाइस चे किनारे खुप बारीक आहेत आणि यात 98% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो मिळतो. सोबतच यात एक पॉप-अप सेल्फी कॅमेरा पण आहे.