पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असलेला Vivo Apex झाला सादर
कंपनी ने Vivo Apex कॉन्सेप्ट फोन ला अधिकृतपणे सादर केले आहे आणि यात स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असणार हे स्पष्ट केले आहे.
कंपनी ने आपला कॉन्सेप्ट स्मार्टफोन Vivo Apex ला काही दिवसांपूर्वी आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये सादर केले होते. या डिवाइस चे किनारे खुप बारीक आहेत आणि यात 98% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळतो. सोबतच या फोन मध्ये एक पॉप-अप सेल्फी कॅमेरा पण आहे.
याला एक कॉन्सेप्ट फोन म्हणून सादर करण्यात आले होते, पण आता कंपनी ने याला चीन मध्ये अधिकृतरित्या सादर केले आहे. कंपनी याला यावर्षीच्या तिसर्या तिमाहीत बाजारात विक्रीसाठी आणेल, अशी माहिती ITHome ने आपल्या एका रिपोर्ट मध्ये दिली आहे.
जरी आता पर्यंत कंपनी ने याच्या किंमतीच्या बाबतीत कोणतीही माहिती दिली नाही, पण कंपनी ने फोनच्या प्रोसेसर च्या बाबतीत माहिती दिली आहे या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल.
हा फोन कंपनी च्या "हाफ-स्क्रीन" फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल, पण हा फीचर डिस्प्ले च्या एक तृतियांश पेक्षा जास्त भागावर चालेल. हा एक थिन-बेजल स्मार्टफोन आहे. यात 5.99-इंचाचा OLED डिस्प्ले COF टेक्नोलॉजी सह देण्यात आला आहे. कंपनी ने यात स्क्रीन साउंड कास्टिंग टेक्नोलॉजी पण दिली आहे.