व्हिडियोकॉनने लाँच केले तीन नवीन स्मार्टफोन्स

व्हिडियोकॉनने लाँच केले तीन नवीन स्मार्टफोन्स
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोन्सची किंमत क्रमश: ६,९९९, ४,८९९ आणि ४,५९९ अशी ठेवण्यात आली आहे. ह्या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये ड्यूल सिम आहे.

मोबाईल निर्माता कंपनी व्हिडियोकॉनने आपले तीन नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. हे स्मार्टफोन्स आहेत, व्हिडियोकॉन Z55 डिलाईट, व्हिडियोकॉन इनफीनियम Z45 डेजल आणि व्हिडियोकॉन इनफीनियम Z45 अमेज. ह्या स्मार्टफोनची किंमत क्रमश: ६,९९९, ४,८९९ आणि ४,५९९ रुपये अशी आहे. तिन्ही स्मार्टफोन्स ड्यूल सिमने सुसज्ज असतील.

 

जर व्हिडियोकॉन Z55 डिलाइट स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. ह्यात 1.4GHz कॉर्टेक्स A7 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि १जीबी रॅम दिली आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. ह्यात २२००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात 3G सपोर्ट दिला गेला आहे, हा ऑपरेटिंग सिस्टम 4.4 किटकॅटवर आधारित आहे.

तर व्हिडियोकॉन इनफीनियम Z45 डेजल स्मार्टफोनमध्ये ४.५ इंचाची डिस्प्ले दिली गेला आहे, ज्याचे रिझोल्युशन 854×840 पिक्सेल आहे. ह्यात १ जीबीची रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टपोन ५ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमे-याने सुसज्ज आहे.

तिथेच जर इनफीनियम Z45  अमेजबाबत बोलायचे झाले तर, ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे आणि फ्रंटमध्ये VGA कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ४.४ किटकॅटवर चालतो. ह्यात 1600mAh ची बॅटरी दिली गेली आहे आणि हा 3G आणि वायफायने सुसज्ज आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo