ह्या फोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक 64-बिट प्रोसेसर आहे. हा फोन 2GB रॅमने सुसज्ज असून हयात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
व्हिडियोकॉनने बाजारात आपला नवीन फोन क्रिप्टन V50JG लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 4G ला सपोर्ट करतो. बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्या फोनमध्ये ErosNow चा अॅप प्री-इन्स्टॉल्ड मिळतो, ज्याच्या अंतर्गत यूजरला ६ महिन्याची मोफत सदस्यत्व मिळते.
ह्या फोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले देण्यात आली आहे. ही डिस्प्ले ड्रॅगनट्रेल X ग्लाससह येते. ह्या फोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक 64 बिट प्रोसेसर आहे. हा फोन 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्या स्टोरेजला 64GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
त्याशिवाय ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा ड्यूल-LED फ्लॅशसह येतो. ह्यात फेज डिटेक्शन ऑटो-फोकससह येतो. ह्या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फ्रंट कॅमे-यातसुद्धा LED फ्लॅश देण्यात आला आहे.