व्हिडियोकॉन चॅलेंजर V40UE स्मार्टफोन लाँच, किंमत ३,७९९ रुपये

Updated on 21-Jun-2016
HIGHLIGHTS

व्हिडियोकॉन चॅलेंजर V40UE स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट शॉपक्लूजवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी व्हिडियोकॉनने बाजारात आपला नवीन फोन चॅलेंजर V40UE लाँच केला. कंपनीने आपल्या ह्या फोनची किंमत ३,७९९ रुपये ठेवली आहे. स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट शॉपक्लूजवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची FWVGA डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 800×480 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 233ppi आहे. हा स्मार्टफोन 1.3Ghz क्वाड-कोर प्रोसेसर (SC7731 चिपसेटसह) सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 512MB ची रॅमसुद्धा दिली आहे.

हा फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. फोनमध्ये 1400mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे. हा 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

ह्या फोनमध्ये 3.2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा LED फ्लॅशसह येतो.

हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :