काही दिवसांपूर्वी आलेल्या काही लीक्स मध्ये दावा करण्यात आला आहे की या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल.
काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक इमेज वरून समजले आहे की, Xiaomi Mi Mix 2s चा सेल्फी कॅमेरा या फोनच्या टॉप राइट मध्ये असेल. यात स्क्रीन चे किनारे खुप बारीक असतिल. काल या फोन बद्दल एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात कॅमेरा दुसर्याच जागी असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता या फोनचा एक नया वीडियो समोर आला आहे, ज्यात याचा सेल्फी कॅमेरा डिस्प्ले मध्ये किनार्यावर देण्यात आला आहे. पण या वीडियो मध्ये या फोनचा बॉटम भाग दिसत नाही आहे. या वीडियो वरून समजते की या फोन मध्ये नॉच डिजाइन आहे. काही दिवसांपूर्वी वेइबो वर समोर आलेल्या एका फोटो मध्ये या फोनच्या आधीच्या जनरेशन सोबत याची तुलना करण्यात आली आहे. Mi MIX 2S मध्ये वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप च्या मध्ये LED फ्लॅश ला जागा देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेंसर ला पण जागा देण्यात आली आहे. या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा पण असेल.
आधी समोर आलेल्या काही रिपोर्ट नुसार, Mi MIX 2S मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल, जो या नव्या फोटोज शी मेळ नाही खात.