विआन मोबाईल्सने लाँच केले ५ फोन्स

विआन मोबाईल्सने लाँच केले ५ फोन्स
HIGHLIGHTS

विआन मोबाईलच्या अंतर्गत V-1.8, V.इमर्ज, V-इम्पॉवर, V-इनकोर आणि V-इंटरनल हे पाच फोन्स लाँच केले आहे. ह्यात ४ स्मार्टफोन्स आणि १ फीचर फोन आहे.

मोबाईल निर्माता कंपनी विआनने मोबाईल मार्केटमध्ये उतरविण्यासोबत आपले ५ मोबाईल फोन्स बाजारात लाँच केले आहे. विआन मोबाईल्सच्या अंतर्गत हे पाच फोन सादर केले आहेत. ज्यांची किंमत ८४९ रुपयांपासून १२,९९९ रुपयांपर्यंत आहे.

 

ह्या फोन्सच्या लाँचिंगसाठी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, जितेंद्र, मलायका अरोरा खान, फराह खान आणि मनीष पॉल उपस्थित होते.

विआन मोबाईलच्या अंतर्गत V-1.8, V इमर्ज, V-इम्पॉवर, V-इनकोर आणि V-इंटरनल हे पाच फोन्स लाँच केले आहेत. ह्यात ४ स्मार्टफोन्स आणि १ फीचर फोन आहे. ह्या फोनसोबत ग्राहकांना एक वर्षाचे V-असिस्टचे मोफत सब्सक्रिप्शन उपलब्ध होईल.

विआन मोबाईल्समध्ये एक्सक्लूसिव्हली V-असिस्ट फीचर दिले गेले आहे, जे केवळ विआन स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. ही 24×7 चालणारी सेवा आहे आणि ग्राहकांना प्रोडक्ट आणि सुविधांशी संबंधित सर्वोत्कृष्ट डीलबाबत माहिती देतील. सध्यातरी V-असिस्ट फीचर ट्रॅबल, इंटरटेनमेंट, शॉपिंग आणि गिफ्टिंगशी संबंधित सुविधा देतोय. V-एस्स्ट सर्विस हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

बॉलिवूड अभिनेत्रा शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्राने नवीन मोबाईल कंपनी विआन आणली आहे. विआन मोबाईल्सचे नाव हे त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या नावाने ठेवले आहे.   

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo