व्हॅलेंटाईन्स वीक सुरू झाला आहे आणि जर तुम्हाला iPhone 14 सीरीजचा कोणताही फोन एखाद्या खास व्यक्तीला गिफ्ट करायचा असेल तर, या सीरिजवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. iPhone 14, iPhone 14 प्लस, iPhone 14 प्रो आणि iPhone 14 प्रो मॅक्स व्यतिरिक्त चार मॉडेल या सीरिज अंतर्गत येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरीज अंतर्गत येणाऱ्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडेल्सवर 12 हजार 195 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. बघुयात ऑफर्स…
Apple iPhone 14 अधिकृत थर्ड पार्टी सेलर Imagine च्या अधिकृत साइटवरून केवळ 67 हजार 705 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सवलतीमध्ये, 8 हजार 195 रुपयांची झटपट स्टोअर सूट आणि HDFC बँक कार्ड आणि EMI व्यवहाराद्वारे 4 हजार रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
iPhone 14 चा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत 79 हजार 900 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. आता हे उपकरण 8 हजार 195 रुपयांच्या सवलतीनंतर 71 हजार 705 रुपयांना ऑनलाइन विकले जात आहे. बँक कार्ड डिस्काउंटनंतर तुम्हाला हा फोन 67 हजार 705 रुपयांना मिळेल.
रिटेलरच्या वेबसाइटवर माहितीनुसार, आयफोन 14 सीरीजवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे फायदे पुढील 21 दिवसांपर्यंत टिकतील म्हणजेच तुम्हाला 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत iPhone मॉडेल्सवर सूट मिळू शकेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.