Upcoming MI Smartphones: भारतीय बाजारपेठेत Xiaomi चे स्मार्टफोन खूप लोकप्रिय आहेत. तुम्हाला माहितीच असेल की, कंपनी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत भारतात अनेक हँडसेट लाँच करते. पुढील वर्ष म्हणजे 2025 भारतीय वापरकर्त्यांसाठी Xiaomi साठी खूप चांगले असू शकते, कारण कंपनी 2025 मध्ये भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच करेल. चला तर मग लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊयात-
Also Read: सर्वोत्तम फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत 64MP कॅमेरासह येणारे Smartphones, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi कंपनीचा Redmi A4 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. अलीकडेच कंपनीने या स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट देखील जाहीर केली आहे. कंपनीने येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच करेल. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. यावरून समजते की, Amazon च्या माध्यमातून या फोनची विक्री केली जाईल. याद्वारे फोनचे काही फीचर्सदेखील पुढे आले आहेत.
अलीकडेच Xiaomi ने घोषणा केली आहे की, Redmi Note 14 सिरीज लवकरच भारतात लाँच केली जाईल. Redmi कंपनी येत्या डिसेंबर 2024 मध्ये ही सीरीज लाँच करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi 13 लाइनअप जून, 2024 मध्ये लाँच करण्यात आला.
Xiaomi 15 सिरीज ऑक्टोबर 2024 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आली. प्रसिद्ध टीपस्टर Gizmochina च्या ताज्या अहवालानुसार, ती भारतीय बाजारपेठेत मार्च 2025 च्या आसपास लाँच केली जाऊ शकते. या सिरीजअंतर्गत कंपनीने Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro हे दोन मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. मात्र, लक्षात घ्या की, त्याचे फक्त प्रो व्हेरिएंट भारतात येण्याची अपेक्षा आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने यापूर्वी भारतात Xiaomi 14 Ultra आणि Xiaomi 14 फोन्स सादर केले होते. त्यानुसार, कंपनी Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra व्हेरिएंट सादर करेल, असा अंदाज आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी गेल्या वर्षीप्रमाणे CIVI मॉडेल देखील सादर करण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने यासंदर्भात अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.