मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Xiaomi 14 Ultra चा कॅमेरा सज्ज, Latest फोन या महिन्यात होणार लाँच। Tech News 

मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Xiaomi 14 Ultra चा कॅमेरा सज्ज, Latest फोन या महिन्यात होणार लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

25 फेब्रुवारी रोजी Xiaomi 14 Ultra जागतिक स्तरावर लाँच होणार

Xiaomi 14 Ultra ची डिझाईन Xiaomi 13 Ultra पेक्षा थोडी वेगळी आहे.

Xiaomi 14 Ultra चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स कन्फर्म

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपला आगामी स्मार्टफोन 25 फेब्रुवारी रोजी Xiaomi 14 Ultra जागतिक स्तरावर लाँच करणार आहे. तर, 22 फेब्रुवारीला चीनच्या होम मार्केटमध्ये लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्रँड लाँच डेटसोबत फोनची इमेज देखील टीज आहे. या इमेजेसद्वारे फोनची डिझाईन समोर आली आहे. यासोबतच, डिव्हाईसच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सचीही पुष्टी झाली आहे. चला बघुयात डिझाईन आणि फीचर्स-

हे सुद्धा वाचा: OnePlus Phone Best Offer: 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ 5G फोन झाला स्वस्त, अशी संधी पुन्हा मिळणार नाही

Xiaomi 14 Ultra ची डिझाईन

Xiaomi 14 Ultra ची डिझाईन Xiaomi 13 Ultra पेक्षा थोडी वेगळी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअपसाठी एक मोठा राऊंड कॅमेरा मॉड्यूल आहे. ड्युअल LED फ्लॅश युनिट आणि सेंटरला लेसिया ब्रँडिंग आहे.

फोनच्या पुढील भागात त्याच्या पॅनलला मायक्रो कर्व ठेवण्यात आले आहे. मायक्रो कर्व म्हणजे खूप सपाट किंवा खूप कर्व देखील नाही. या डिझाईनमुळे हा फोन एकदम प्रीमियम दिसतो. डिस्प्लेवर पंच होल नॉच देण्यात येईल. एवढेच नाही तर, उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटन्स देखील दिली आहेत.

Xiaomi 14 Ultra चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स कन्फर्म

Xiaomi ने पुष्टी केली आहे की, Xiaomi 14 Ultra मध्ये 50MP LYT-900 प्रायमरी कॅमेरा असेल. हा सेकंड जनरेशन 1 इंच कॅमेरा सेन्सर आहे. फोनच्या टेलीफोटो लेन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP चा IMX858 कॅमेरा सेंसर असेल. ज्यामध्ये f/1.8 अपर्चर, 75 मिमी फोकल लांबी आणि 3.2x ऑप्टिकल झूम असेल. एवढेच नाही तर, कंपनीने पुष्टी केली की Xiaomi 14 Ultra मध्ये 50MP Sony IMX858 periscope telephoto लेन्स असेल.

xiaomi 14 ultra

Xiaomi 14 Ultra चे अपेक्षित तपशील

लीकनुसार, Xiaomi 14 Ultra मोबाईल मध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येईल. यात परफॉर्मन्ससाठी, क्वालकॉमची सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिप त्यात इन्स्टॉल केली जाऊ शकते. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,180 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हे फोन चार्ज करण्यासाठी 90W फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo