बहुप्रतीक्षित Xiaomi 14 सिरीजची गोबल लाँच डेट कन्फर्म झाली आहे. ही 2023 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आली होती. या सिरीज अंतर्गत कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro मॉडेल समाविष्ट केले आहेत. त्यानंतर, आता हे दोन्ही फोन लवकरच जागतिक बाजारपेठेत दाखल होणार आहेत. होय, कंपनीने अखेर सिरीजच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे. चला तर मग जाणून त Xiaomi 14 सिरीजच्या लाँचशी संबंधित सर्व तपशील आणि लीक्स-
हे सुद्धा वाचा: 108MP कॅमेरा आणि स्टायलिश डिझाईनसह येणाऱ्या Realme 11 5G फोनवर Discount, मिळतायेत उत्तम ऑफर्स। Tech News
Xiaomi ने त्याच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलद्वारे Xiaomi 14 सिरीजची लाँच डेट कन्फर्म केली आहे. ही सिरीज 25 फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारपेठेत लाँच होणार आहे. कंपनी याच वेळी Xiaomi 14 Ultra मॉडेल देखील लाँच करू शकते, अशा चर्चा देखील सुरु आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनी Xiaomi 14 सिरीज जागतिक बाजारपेठेपूर्वीच गेल्या वर्षी चीनी बाजारपेठेत दाखल झाली होती. या सीरीजमध्ये कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro हे दोन फोन लाँच केले होते. त्यामुळे, जागतिक बाजारपेठेत लाँच केलेले मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स देखील चीनी बाजारात लाँच झालेल्या मॉडेल्सप्रमाणेच असतील.
चायनीज मॉडेलप्रमाणे, Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro मॉडेल मोठ्या प्रमाणात समान स्पेसिफिकेशन्ससह येतात. Xiaomi 14 मध्ये 6.36 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी दोन्ही फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोन OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरासह येतात. यात 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 14 फोनमध्ये 4,610mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तर दुसरीकडे, Xiaomi 14 Pro फोनमध्ये 4,880mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.