Price Leak! लाँचपूर्वीच Vivo Y58 5G फोनची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये होणार का दाखल? 

Price Leak! लाँचपूर्वीच Vivo Y58 5G फोनची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये होणार का दाखल? 
HIGHLIGHTS

Vivo चा Vivo Y58 5G फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.

लीकनुसार Vivo Y58 5G स्मार्टफोन भारतात 20 हजार रुपयांच्या कमी किमतीत लाँच केला जाईल.

आगामी Vivo फोन Snapdragon 4 Gen 3 octacore प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो.

Vivo Y58 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo Y58 5G फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. होय, आगामी फोन उद्या म्हणजेच 20 जून रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आधीच उघड झाले आहेत. दरम्यान, उद्याच्या होणाऱ्या लाँचपूर्वीच Vivo Y58 5G ची किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी Vivo Y58 5G ची किंमत 20 हजार रुपयांच्या आत असण्याची शक्यता आहे.

Also Read: लेटेस्ट Oppo Reno 12 सीरिजचे स्मार्टफोन्स ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स। Tech News

Vivo Y58 5G ची लीक किंमत

Vivo Y58 5G फोनशी संबंधित हे लीक एका प्रसिद्ध टिपस्टरच्या माध्यमातून समोर आले आहेत. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा स्मार्टफोन भारतात 20 हजार रुपयांच्या कमी किमतीत लाँच केला जाईल. या लीकमध्ये फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,499 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीनतम Vivo स्मार्टफोन 20 जूनपासून ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Vivo Y58 5G India launch date in India confirmed for June 20
Vivo Y58 5G India launch date in India confirmed for June 20

Vivo Y58 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y58 5G बद्दल अनेक लीक पुढे आले आहेत. Vivo Y58 5G फोन 6.72 इंच लांबीच्या फुल HD डिस्प्लेवर लाँच केला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 4 Gen 3 octacore प्रोसेसरवर लॉन्च केला जाऊ शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB RAM+ 8GB विस्तारित रॅमसह प्रदान केला जाईल. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आणि 1TB मेमरी कार्ड सपोर्ट असू शकतो.

याव्यतिरिक्त, लीकनुसार फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सपोर्टसह येईल. फोनच्या मागील पॅनलवर 50MP AI पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी सेन्सर प्रदान केला जाईल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा सपोर्ट करेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन मजबूत 6,000mAh बॅटरीसह लाँच केला जाईल. ही मोठी बॅटरी 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo