Vivo Y36 Leaks: लाँचपूर्वीच आगामी स्मार्टफोनची प्राईस लीक, तुमच्या बजेटमध्ये येणार का फोन?

Vivo Y36 Leaks: लाँचपूर्वीच आगामी स्मार्टफोनची प्राईस लीक, तुमच्या बजेटमध्ये येणार का फोन?
HIGHLIGHTS

Vivo भारतीय बाजारपेठेत आपला आगामी स्मार्टफोन Y36 4G सादर करेल.

हा फोन Vivo Y35 स्मार्टफोनचा सक्सेसर असेल.

आगामी Vivo Y36 4G स्मार्टफोन 26 जून 2023 रोजी भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

Vivo Y36 4G Leaks: Vivo भारतीय बाजारपेठेत आपला आगामी स्मार्टफोन Y36 4G सादर करण्याच्या तयारीत आहे. हा फोन Vivo Y35 स्मार्टफोनचा सक्सेसर असेल, अशी माहिती मिळाली आहे. Vivo Y35 कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केला होता. Vivo Y36 4G बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन नुकताच परदेशात म्हणजेच  इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. अधिकृत लाँच पूर्वीच काही अहवालांमध्ये आगामी स्मार्टफोनच्या लाँचची तारीख आणि किंमत जाहीर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या फोनचे लीक्स आणि इतर डिटेल्स बघुयात- 

Vivo Y36 4G ची संभावित लाँच डेट आणि किमंत

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी Vivo Y36 4G स्मार्टफोन 26 जून 2023 रोजी भारतीय बाजारात सादर केला जाईल. आगामी स्मार्टफोनची किंमत 19,500 रुपये असेल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि क्रीम या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. 

 Vivo Y36 4G चे अपेक्षित स्पेक्स 

Vivo Y36 4G स्मार्टफोनमध्ये 6.64-इंच लांबीचा अल्ट्रा OLCD डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, हा Vivo स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे, ज्यासह 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळू शकते. Vivo Y36 4G स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Vivo Y35 ची किंमत आणि मुख्य तपशील 

Vivo Y35 5G मध्ये 6.51 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. यासह, Vivo Y35 5G स्मार्टफोन Octa Core Dimensity 700 चिपसेटने सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास,  यात 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. Vivo Y35 5G चा 4 GB RAM + 128 GB स्टोरेज प्रकार 1,199 युआन म्हणजेच सुमारे 14,154 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo