प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo ची Vivo X200 सीरीज भारतात उद्या म्हणजेच 12 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सीरीजअंतर्गत कंपनी Vivo X200 आणि Vivo X200 Pro मॉडेल लाँच करू शकते. हे स्मार्टफोन्स आधीच चीनच्या बाजारात लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान ताज्या लीकमध्ये, लाँचच्या तोंडावरच या स्मार्टफोन सिरीजची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात Vivo X200 सिरीज तुमच्या बजेटमध्ये बसेल की नाही?
Also Read: Price Drop! 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy F55 5G वर तब्बल 6000 रुपयांची घसरण
प्रसिद्ध टीपस्टर अभिषेक यादवने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये Vivo X200 सिरीजची भारतीय किंमत लीक झाली आहे. लीकनुसार, Vivo X200 फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 65,999 रुपये असण्याची शक्यता आहे. तर, 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 71,999 रुपये असू शकते.
तुम्ही वर दिलेल्या लिंकमध्ये लीक किंमत पाहू शकता. तर दुसरीकडे, सिरीजच्या टॉप मॉडेल Vivo X200 Pro स्मार्टफोनची किंमत 94,999 रुपये असू शकते. लीकनुसार, ही फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत असेल.
आगामी Vivo X200 सिरीजच्या अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या सीरिजचे फोन MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतात. Vivo X200 Pro फोन 6000mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येऊ शकतो, जी 90W फास्ट चार्जिंगसह असेल. तर, प्रो मॉडेल 5,800mAh बॅटरीसह येऊ शकतो, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
तसेच, Vivo X200 फोटोग्राफीसाठी स्टँडर्ड मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX921 प्राथमिक कॅमेरा मिळू शकतो. तर, दुसरीकडे Vivo X200 Pro मध्ये 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP Sony IMX882 टेलिफोटो सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, 200MP Zeiss APO टेलिफोटो सेन्सर प्रो मॉडेलमध्ये आढळण्याची शक्यता आहे.