आगामी Vivo V40e फोनची लाँच तारीख जाहीर! Powerful फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल
आगामी स्मार्टफोन Vivo V40e च्या भारतीय लाँच डेट जाहीर
Vivo V40e भारतीय बाजारात 25 सप्टेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल.
हँडसेट Vivo India च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर देखील विकला जाईल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा आगामी स्मार्टफोन Vivo V40e च्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु आहे. हे विविध प्रमाणन वेबसाइटवर दिसून आले आहे. रिपोर्ट्समध्ये फोनच्या स्पेशल स्पेसिफिकेशन्ससोबतच किंमत देखील लीक झाली आहे. आता अखेर कंपनीने या फोनच्या भारतीय लाँचची तारीख जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. या सिरीज अंतर्गत Vivo V40 आणि Vivo V40 pro 5G फोन आधीच बाजारात उपलब्ध आहेत.
Also Read: लेटेस्ट iPhone 16 सिरीजची पहिली Sale भारतात आज, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी
Vivo V40e ची भारतीय लाँच डेट
A magnificence that matches your taste of luxury. Launching on 25th Sep!
— vivo India (@Vivo_India) September 20, 2024
Click the link below to know more.https://t.co/6VRKxgBspk#vivoV40e #PortraitSoPro #10Yearsofvivo pic.twitter.com/4ESHlp8bjO
Vivo चा नवीनतम स्मार्टफोन Vivo V40e भारतीय बाजारात 25 सप्टेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, हँडसेट Vivo India च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर देखील विकला जाईल. हा फोन रॉयल ब्रॉंझ आणि मिंट ग्रीन या दोन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Vivo V40e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo V40e फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनीने या फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व स्क्रीन डिस्प्ले आहे. फोनचे डायमेन्शन्स देखील उघड झाले आहेत. या स्मार्टफोनची जाडी 7.49mm आहे. तर, फोनचे वजन 183 ग्रॅम असेल. हा स्मार्टफोन आकर्षक डिझाईनसह सादर केला जाईल.
गीकबेंच सूचीनुसार, फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC, 8GB रॅम असेल. तर, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 50MP Sony IMX882 सेन्सर, 2x पोर्ट्रेट मोड आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी, फोन ऑटो फोकससह 50MP कॅमेरासह सुसज्ज असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी असेल, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile