लाँचपूर्वीच आगामी Vivo V40e ची किंमत लीक! 50MP सेल्फी कॅमेरा मिळतील अनेक Powerful फीचर्स

Updated on 17-Sep-2024
HIGHLIGHTS

Vivo चा आगामी Vivo V40e स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होण्यास सज्ज

आगामी स्मार्टफोन Vivo V40e फोनची किंमत लाँचपूर्वीच लीक झाली आहे.

Vivo V40e स्मार्टफोन मॉन्सून ग्रीन आणि रॉयल ब्राँझचा कलर ऑप्शन्समध्ये मिळतील.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo चा आगामी Vivo V40e स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होण्यास सज्ज झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने गेल्या महिन्यातच Vivo V40 सीरीज भारतीय बाजारात सादर केली आहे. आता कंपनी या सिरीजचा विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँच होण्यापूर्वीच या फोनचे लीक्स सोशल मीडियावर पुढे येत आहेत. लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. एवढेच नाही तर, रिपोर्ट्समध्ये Vivo V40e फोनची किंमतही लीक झाली आहे. पाहुयात तपशील-

Also Read: लेटेस्ट Realme P2 Pro 5G ची आज भारतात दोन तासांची Special सेल, मिळतील अगदी जबरदस्त ऑफर्स

Vivo V40e ची किंमत लाँचपूर्वीच लीक

वर सांगितल्याप्रमाणे, आगामी स्मार्टफोन Vivo V40e फोनची किंमत लाँचपूर्वीच लीक झाली आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत 20 हजार रुपये सुरुवातीच्या किमतीत सादर केला जाऊ शकतो. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 30,000 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.

Vivo-V40e

एका प्रसिद्ध प्रकाशकाच्या ताज्या अहवालानुसार, Vivo V40e स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. हा फोन मॉन्सून ग्रीन आणि रॉयल ब्राँझचा कलर ऑप्शन्समध्ये मिळतील. हा फोन दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये असेल. हा फोन 8GB पर्यंत रॅमसह 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येण्याची अपेक्षा आहे.

Vivo V40e चे अपेक्षित तपशील

Vivo च्या या आगामी फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनचे स्क्रीन साईज Vivo V40 आणि Vivo V40 Pro सारखा असेल. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony IMX882 प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळू शकतो.

आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तर, हा फोन 80W वायर्ड फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. फोनमध्ये पाण्याच्या प्रतिकारासाठी IP65 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. हा फोन Android 14 वर आधारित FuntouchOS 114 कस्टम स्किनवर चालू शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :