Vivo T3 Ultra लवकरच भारतात होणार लाँच! किंमत आणि विशेष फीचर्स लीक, तुमच्या बजेटमध्ये येईल का आगामी फोन?

Updated on 30-Aug-2024
HIGHLIGHTS

आगामी Vivo T3 Ultra स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे.

Vivo T सिरीजचा हा Vivo T3 Ultra फोन BIS सारख्या अनेक प्रमाणन वेबसाइटवर दिसला आहे.

आगामी Vivo T3 Ultra स्मार्टफोन भारतात पुढील म्हणजेच सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाईल.

Vivo चा आगामी Vivo T3 Ultra स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vivo T सीरीजचे अनेक स्मार्टफोन्स भारतात आधीच खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर, आता कंपनी या सिरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Also Read: Motorola Razr 50 ची भारतीय लाँच डेट जाहीर! मिड बजेटमध्ये सादर होणार नवा फोल्डेबल स्मार्टफोन

आम्ही तुम्हा सांगतो की, Vivo T सिरीजचा हा Vivo T3 Ultra फोन BIS सारख्या अनेक प्रमाणन वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे तो भारतीय बाजारपेठेत लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. तर, लाँच होण्याआधीच फोनचे स्पेशल स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत. त्याबरोबरच, या नव्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पाहुयात Vivo T3 Ultra बद्दल सर्व तपशील-

Vivo T3 Ultra चे भारतीय लाँच

पुढे आलेल्या ताज्या अहवालानुसार, आगामी Vivo T3 Ultra स्मार्टफोन भारतात पुढील म्हणजेच सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाईल. अहवालात अद्याप लाँचची नेमकी तारीख समोर आलेली नाही. हा Vivo T सीरीजचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असेल, असा दावा देखील रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, अद्याप Vivo India ने फोनच्या लाँच आणि किंमतीशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

Vivo T3 Ultra ची अपेक्षित किंमत

प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने Vivo T3 Ultra फोनची किंमत आणि सर्व तपशील उघड केला आहे. टिपस्टरनुसार, हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाणार आहे. यामध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेजसह बेस व्हेरिएंट, फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि शीर्ष वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सुसज्ज असेल. हा फोन फ्रॉस्ट ग्रीन आणि लुनर ग्रे या दोन कलर ऑप्शन्ससह येईल.

Vivo T3 Ultra चे अपेक्षित तपशील

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Vivo T3 Ultra मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर, हा फोन 1.5k 3D कर्व AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे. त्याबरोबरच, या हँडसेटला OIS सपोर्टसह Sony IMX921 रियर कॅमेरा सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :