स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Vivo T3 Ultra स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील Flipkart आणि अधिकृत Vivo साइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे याची पुष्टी झाली आहे की, हा फोन फ्लिपकार्टद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, फ्लिपकार्ट सूचीद्वारे लाँचपूर्वी या फोनचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात Vivo T3 Ultra चे सर्व तपशील-
वर सांगितल्याप्रमाणे, Vivo T3 Ultra च्या लाँचपूर्वीच कंपनीने आगामी फोनचे अनेक फीचर्स उघड केले आहेत. हा फोन 3D कर्व AMOLED डिस्प्लेसह दाखल केली जाईल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. त्याबरोबरच, कंपनीचा दावा आहे की, हा फोन IP68 रेटिंगसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरने सुसज्ज असेल.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनसह तुम्हाला 12GB रॅम आणि 12GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळेल. तर, फोनचे स्टोरेज 256GB पर्यंत असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP Sony IMX 921 प्रायमरी कॅमेरा असेल, ज्यासोबत OIS सपोर्ट देखील मिळणार आहे. यासह 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील उपलब्ध असणार आहे.
विशेष म्हणजे हा फोन सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी 50MP फ्रंट कॅमेरासह येईल, असे देखील पुढे आले आहे. यासोबतच, Aura Light फीचर देखील उपलब्ध असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500mAh बॅटरी असेल, ज्यासोबत 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Vivo V40 सीरिजच्या स्मार्टफोनसारखा दिसतो.