Vivo कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. या लाईनअपमध्ये आता एक नवीन स्मार्टफोन Vivo T3 Lite 5G देखील लाँच होणार आहे. काल या मोबाईलचे प्रोडक्ट पेज Flipkart शॉपिंग साइटवर लाइव्ह झाले होते, तर आज या फोनच्या लाँचची तारीख ब्रँडने जाहीर केली आहे. Vivo T3 Lite 5G भारतात पुढील आठवड्यात लाँच करण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अलीकडेच भारतात लाँच झालेल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनची किंमत 13,499 रुपये आहे. जाणून घेऊयात Vivo T3 Lite 5G च्या इंडिया लॉन्चिंगबद्दल सविस्तर माहिती-
Also Read: 108MP कॅमेरासह Infinix Note 40 5G फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स
कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली की, 27 जून रोजी भारतात नवीन मोबाइल फोन Vivo T3 Lite 5G लाँच केला जाईल. Vivo T3 Lite 5G ची किंमत आणि इतर तपशील तुम्हाला पुढील गुरुवारी दुपारी 12 वाजता समजतील. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. आगामी स्मार्टफोनला Vivo चा सर्वात परवडणारा Dual 5G स्मार्टफोन म्हटले जात आहे.
अलिडकेच पुढे आलेल्या लीकवर विश्वास ठेवला तर, Vivo T3 Lite 5G फोन कमी बजेटमध्ये आणला जाणार आहे. Vivo T3 Lite 5G ची किंमत सुमारे 12 हजार रुपये ठेवली जाऊ शकते. या फोनची सुरुवातीची किंमत या रेंजमध्ये असेल, तर मोबाइलच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत निश्चित केली जाऊ शकते. मात्र खरी किंमत आणि स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती 27 जून रोजी फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
तसेच लीकद्वारे फोनचे काही महत्त्वाचे तपशील देखील पुढे आले आहेत. आगामी Vivo स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी सोनी सेन्सर वापरण्यात येणार आहे, जो 50MP कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी Vivo T3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये मोठी 5,000mAh बॅटरी मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, 5,000mAh बॅटरी वेब सर्फिंग आणि इतर मूभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.