Tecno Camon 30 सिरीज भारतात लवकरच होणार लाँच, मिळतील अनेक Powerful फीचर्स। Tech News
लेटेस्ट Tecno Camon 30 सिरीज भारतात लाँच होण्यासाठी सज्ज
सिरीजमध्ये Tecno Camon 30, Camon 30 5G, Camon 30 Pro आणि Camon 30 Premier यांचा समावेश
कंपनीने टीझर जारी करून नव्या फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता ची लेटेस्ट Tecno Camon 30 सिरीज भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. एवढेच नाही तर, या आठवड्यात भारतीय बाजारात अनेक नवे स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये Samsung, IQOO, Motorola इ. स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. दरम्यान, Tecno Camon 30 सिरीजचे स्मार्टफोन्स येत्या 18 मे रोजी भारतात लाँच होणार अशी माहिती मिळाली आहे. या सिरीजमध्ये Tecno Camon 30, Camon 30 5G, Camon 30 Pro आणि Camon 30 Premier यांचा समावेश आहे. पण भारतात कोणते मॉडेल लाँच करणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. बघुयात सविस्तर माहिती-
हे सुद्धा वाचा: Smartphones Launch This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स, IQOO, Samsung चे फोन यादीत समाविष्ट
Tecno Camon 30 सिरीजचे भारतीय लाँच
Tecno Camon 30 च्या भारतीय लाँचची अलीकडेच पुष्टी करण्यात आली आहे. कंपनीने टीझर जारी करून नव्या फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. टीझरमध्ये एका मॉडेलची पुष्टी करण्यात आली आहे. होय, येथे Tecno Camon 30 प्रीमियरचे लाँच कन्फर्म केले आहे. कंपनीने आगामी स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह केली आहे.
Tecno Camon 30
Tecno Camon 30 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Mediatek Dimensity 7020 चिपसेट देण्यात आली आहे. यात 8GB रॅम आणि 256GB बिल्ट-इन स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि AI लेन्स आहे. त्याबरोबरच, ऑटोफोकस सपोर्टसह 50MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 70W फास्ट चार्जिंगसह येईल.
Tecno Camon 30 Premier
कंपनीने Tecno Camon 30 Premier मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.77 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Dimensity 8200 चिपसेट दिला गेला आहे. फोटोग्राफीसाठी, यात आणखी दोन लेन्ससह मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. मात्र, कंपनी हा फोन भारतात या फीचर्ससह लाँच करते की नाही? हे स्मार्टफोन लाँच झाल्यानंतरच कळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile