Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार प्रसिद्ध स्मार्टफोन्स, Redmi, Vivo फोन्स समाविष्ट
या आठवड्यात 3 स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार
Vivo X200 सिरीज भारतीय बाजारात येत्या 12 डिसेंबर रोजी लाँच होणार
Redmi Note 14 सिरीज आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार
Upcoming Smartphones This Week: नव्या वर्षाला आता सुरुवात होणार असून डिसेंबरचा दुसरा आठवडा देखील सुरु झाला आहे. पहिल्या आठवड्यात अनेक स्मार्टफोन्स भारतात दाखल झाले असून, दुसरा आठवडा देखील स्मार्टफोन लाँचच्या नावावर असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या आठवड्यात 3 स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. यामध्ये Xiaomi, Vivo आणि Motorola चा समावेश आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात लवकरच भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: लक्ष द्या! सुप्रसिद्ध CMF Phone 1 च्या स्फोटामुळे महाराष्ट्रात दुचाकीचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू
Redmi Note 14 सिरीज
आगामी Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सध्या सुरु आहे. या फोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी देखील झाली आहे. ही सिरीज आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ फोन लाँच करण्याची अपेक्षा आहे. प्रो प्लस हा फोन सीरीजचा प्रीमियम फोन असणार आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच फोनची किंमत आणि सर्व योग्य तपशील पुढे येतील.
Moto G35
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Moto G35 फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. भारतात हा स्मार्टफोन 10 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत धडकला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Unisoc T760 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Vivo X200 सिरीज
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी Vivo X200 सीरीजच्या भारतीय लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हा स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात येत्या 12 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी Vivo X200 आणि Vivo X200 Pro फोन सादर करण्याची अपेक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ही भारतातील पहिली सिरीज असेल, ज्यामध्ये 200MP ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile