Upcoming Smartphones This Week: या आठवड्यात भारतात लाँच होणार भारी फोन्स, पहा यादी
नोव्हेंबर 2024 चा तिसरा आठवडा देखील स्मार्टफोन्स लाँचसाठी विशेष असणार आहे.
Redmi चा Redmi A4 5G भारतात 20 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.
Vivo चा Vivo Y300 फोन भारतात 21 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.
Upcoming Smartphones This Week: नोव्हेंबर 2024 च्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात भारतीय बाजारपेठेत अप्रतिम स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. त्याबरोरबच, हा आठवडा देखील स्मार्टफोन्स लाँचसाठी विशेष असणार आहे. या आठवड्यात भारतात दोन जबरदस्त स्मार्टफोन्स लाँचसाठी सज्ज झाले आहेत. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची प्रतीक्षा बरेच दिवसांपासून सुरु आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात या आठवड्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: Upcoming MI Smartphones: प्रसिद्ध कंपनी लवकरच भारतात लाँच करणार जबरदस्त फोन्स, पहा यादी
Redmi A4 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi चा Redmi A4 5G भारतात 20 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरसह येणार आहे. या प्रोसेसरसह हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसाठी Xiaomi आणि Qualcomm यांच्यात पार्टनरशिप झाली आहे. ज्या अंतर्गत Redmi A4 5G भारतीय मोबाइल वापरकर्त्यांनुसार खास कस्टमाइझ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय भाषांना पाठिंबा देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना लाँच करण्यात येणार आहे.
Vivo Y300
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo Y300 फोन भारतात 21 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅमवर लाँच केला जाणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरवर लाँच केला जाणार आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हे 128GB आणि 256GB स्टोरेजसह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12 ते 22 हजार रुपयांदरम्यान असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.
फोनचे इतर अपेक्षित स्पेसिफिकेशन्स, Vivo Y300 या मोबाईलमध्ये 6.7-इंच लांबीची AMOLED स्क्रीन दिली जाऊ शकते, जी 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP IMX882 ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल, चार्जिंगसाठी 80W FlashCharge तंत्रज्ञान उपलब्ध असेल. पाणी आणि धुळाच्या प्रतिकारासाठी हा फोन IP64 प्रमाणित आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile