Upcoming Smartphones This Week: नोव्हेंबर महिना सुरु झाल्यापासून अनेक बहुप्रतिक्षीत आणि जबरदस्त स्मार्टफोन्स या आठवड्यात लाँच करण्यात आले आहे. पाहता पाहता या महिन्याचा शेवटचा आठवडा देखील सुरु झाला आहे. या आठवड्यात सुद्धा दोन टॉप ब्रँड्सचे नवे स्मार्टफोन्स भारतीय लाँचसाठी सज्ज झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Nokia फोन निर्माता कंपनी HMD नवा स्मार्टफोन आणत आहे. तर, दुसरीकडे Realme आपला Snapdragon Elite 8 प्रोसेसर असलेला देशातील पहिला फोन या आठवड्यात सादर करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या दोन्ही फोन्सचे तपशील-
Also Read: Room Heaters Deals: कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करा, पहा 2000 रुपयांअंतर्गत सर्वोत्तम पर्याय
HMD चा नवा स्मार्टफोन HMD Fusion फोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. विशेष म्हणजे हा एक कस्टमाइजेबल स्मार्टफोन आहे, ज्याचे मागील पॅनल उघडले आणि वेगळे केले जाऊ शकते. सर्वत्र मजेशीर गोष्ट म्हणजे यासह ग्राहक त्यांच्या आवडीनुसार कंपनीने प्रदान केलेले ‘स्मार्ट आउटफिट’ देखील जोडू शकतात. मोबाइल वापरकर्ते या फोनमध्ये अतिरिक्त मागील स्क्रीन, रग्ड फ्रेम आणि लाइटिंग फ्रेम इ. जोडू शकतात. या सर्वांसह फोनचा ज्यामुळे फोनचा देखावा आणि डिझाइन आणखी आकर्षक होईल.
या आगामी स्मार्टफोनचे अनेक स्पेक्स पुढे आले आहेत. त्यानुसार, हा स्मार्टफोन 6.56-इंच लांबीच्या HD + 90Hz डिस्प्लेला सपोर्ट करेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी HMD Fusion फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर कार्य करेल. फोटोग्राफीसाठी, यात 108MP बॅक कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, यात 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,000mAh बॅटरी आहे. हा फोन कंपनी 25,000 रुपयांअंतर्गत सादर करण्याची अपेक्षा आहे.
Realme GT 7 Pro हा भारतात लाँच होणारा Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर असलेला पहिला फोन असेल. हा स्मार्टफोन दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर 26 नोव्हेंबर रोजी देशात लाँच केला जाईल. यामध्ये 6.78-इंच लांबीचा 8T LTPO Samsung Eco2 1.5K OLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 6,000 बॅटरीसह प्रदान केला जाईल. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन वॉटरप्रूफ देखील असेल. भारतात या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, जी सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत असेल.