Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात लाँच होणार जबरदस्त फोन्स, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी

Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात लाँच होणार जबरदस्त फोन्स, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

मार्च महिन्याअखेरीस अनेक टेक ब्रँड भारतीय बाजारात त्यांचे नवीन मोबाईल फोन लाँच करणार

23 मार्च ते 30 मार्च दरम्यान लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची यादी

Infinix Note 50x 5G येत्या 27 मार्च रोजी लाँच केला जाऊ शकतो.

Upcoming Smartphones This Week: मार्च महिन्याचा आता अखेरचा आठवडा सुरु झाला आहे. महिना सुरु झाल्यापासून अनेक या शेवटच्या आठवड्यात अनेक टेक ब्रँड भारतीय बाजारात त्यांचे नवीन मोबाईल फोन लाँच करणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या आठवड्यात लाँच होणारे मोबाईल फोन कमी बजेट सेगमेंटचे असतील, ज्यांची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी ठेवता येईल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची माहिती आणि लीक सांगणार आहोत.

Also Read: OnePlus 13 Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर 5000 रुपयांची सूट, पहा आकर्षक 5 फीचर्स

Realme C71

Realme च्या आगामी स्मार्टफोन लाँचची माहिती ऑनलाईन पुढे आली आहे. वृत्तानुसार, Realme भारतात ‘C’ सिरीजचा विस्तार करणार असल्याचे समजत आहे. कंपनी 25 मार्च रोजी भारतात Realme C71 आणि Realme C75 लाँच करेल, अशी शक्यता आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स उघड झालेले नाहीत, पण हा लो बजेटचा डिव्हाइस असावा, अशी अपेक्षा आहे. हा फोन 10,000 रुपयांच्या अंतर्गत आणला जाऊ शकतो. मात्र, फोनबद्दल योग्य माहिती कंपनीने अधिकृत केल्यानंतरच पुढे येईल.

Realme C75

वरील Realme C71 सह कंपनी 25 मार्च रोजी भारतात Realme C75 देखील लाँच करू शकते. या फोनच्या लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 6300 चिपसेट दिला जाऊ शकतो. हा फोन 4GB रॅम आणि 6GB रॅमसह आणला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये उत्तम कॅमेरा मिळणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन मिडनाईट लिली, पर्पल ब्लॉसम आणि लिली व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाऊ शकतो.

upcoming smartphones this week in india

Infinix Note 50x 5G

Infinix Note 50X 5G फोन येत्या 27 मार्च रोजी लाँच केला जाऊ शकतो. या फोनची किंमत सुमारे 12 हजार रुपये असू शकते. कंपनीने माहिती दिली आहे की, हा फोन MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आणि IP64 रेटिंगसह येईल. लीकनुसार, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग असेल. स्मार्टफोनमध्ये 50MP चा ड्युअल कॅमेरा सेन्सर असेल याची देखील पुष्टी झाली आहे. हा फोन भारतीय बाजारात 6GB रॅमसह विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo