Upcoming Smartphones This Week: भारतात बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीजसह लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी 

 Upcoming Smartphones This Week: भारतात बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीजसह लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी 
HIGHLIGHTS

8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान देशात बहुप्रतीक्षित आणि जबरदस्त मोबाईल लाँचसाठी सज्ज

या आठवड्यात बहुप्रतीक्षित iPhone 16 सिरीज लाँच होणार

Realme ‘P’ म्हणजेच पॉवर सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच होणार

Upcoming Smartphones This Week: सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. हा आठवडा भारतीय स्मार्टफोन बाजारात खुप महत्त्वाचा ठरणार आहे. होय, 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान देशात बहुप्रतीक्षित आणि जबरदस्त मोबाईल लाँचसाठी सज्ज झाली आहेत. या आठवड्यात Apple iPhone 16 सिरीज तसेच दोन realme फोन, Tecno हे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता या आठवड्यात लाँच होणाऱ्या मोबाईल फोनचे तपशील जाणून घेऊयात-

Realme Narzo 70 Turbo 5G

Realme कंपनी 9 सप्टेंबर रोजी भारतात आपला नवीन Narzo सिरीज स्मार्टफोन Narzo 70 Turbo लाँच करणार आहे. हा 5G फोन MediaTek Dimensity 7300 Energy chipset वर काम करेल. स्टरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेजने सुसज्ज असू शकतो. Narzo 70 Turbo 5G फोनची जाडी फक्त 7.6mm असेल. फोटोग्राफीसाठी, यात 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

upcoming smartphones in india

iPhone 16 सिरीज

वर्षातील सर्वात बहुतप्रतिक्षित स्मार्टफोन सिरीज Apple iPhone 16 सिरीज येत्या 9 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनी या सिरीज अंतर्गत 4 नवीन आयफोन मॉडेल्ससह सादर करेल, अशी अपेक्षा आहे. या सिरीज अंतर्गत, iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 plus आणि iPhone 16 Pro Max he मॉडेल्स लाँच होतील. स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी, हे दोन्ही फोन Bionic A18 चिप वर लाँच केले जाऊ शकतात, ज्यामध्ये iPhone X सारखा वर्टिकल बॅक कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Tecno Pova 6 Neo 5G

Tecno Pova 6 Neo 5G फोन भारतात 11 सप्टेंबर रोजी लाँच होईल. कंपनी याला सेगमेंटमधील पहिला 5G फोन म्हणून सादर करत आहे. या फोनमध्ये 108MP AI कॅमेरा असेल. फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 3x लॉसलेस इन-सेन्सर झूम टेक्नोलॉजी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये Mediatek चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते.

Vivo T3 Ultra 5G India launch on Sept 12 check confirmed specs
Vivo T3 Ultra 5G India launch on Sept 12 check confirmed specs

Vivo T3 Ultra

Vivo T3 Ultra भारतात 12 सप्टेंबरला लाँच होईल. लक्षात घ्या की, Vivo T3, T3x, T3 Lite आणि T3 Pro नंतर या सीरिजमध्ये लाँच होणारा हा चौथा स्मार्टफोन असेल. नवीन Vivo फोन MediaTek Dimensity 9200+ चिपसेटसह 12GB रॅम दिली जाईल. फोटोग्राफीसाठी 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन 5,500 mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह लॉन्च केला जाईल.

Realme P2 Pro

Realme ‘P’ म्हणजेच पॉवर सीरिजमध्ये लॉन्च होणारा हा तिसरा स्मार्टफोन असेल. हा नवा स्मार्टफोन 13 सप्टेंबर रोजी लाँच केला जाईल. Realme P1 आणि P1 Pro नंतर आता कंपनी Realme P2 Pro घेऊन येत आहे. हा फोन कंपनी बजेट श्रेणीत लाँच करणार आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. ब्रँडकडून असे समोर आले आहे की, Realme P2 Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाईल. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 50MP OIS ड्युअल रियर कॅमेरा देखील मिळू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo