टेक विश्वात अलीकडेच बरेच स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. बहुप्रतीक्षित Apple iPhone 15 सिरीज देखील नुकतेच लाँच करण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात आणखी हँडसेट लाँच होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, 5 ब्रँड्सनी येत्या काही दिवसात त्यांच्या लाँच इव्हेंटची पुष्टी केली आहे. होय, Honor, Motorola, Redmi, Vivo आणि Tecno च्या आगामी स्मार्टफोन्सचा यात समावेश आहे. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सची सविस्तर यादी.
Vivo T2 Pro 5G भारतात 22 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. टीझर आणि लीकवर विश्वास ठेवला तर, हा स्मार्टफोन रीब्रँड केलेला iQOO Z7 Pro असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, iQOO चा हा फोन आधीच Vivo S17e रीब्रँड केलेला आहे. हा हँडसेट स्लिम आणि हलकी डिझाइन, 120Hz कर्व AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 चिपसेट आणि 66W चार्जिंग सपोर्टसह येईल.
Motorola Edge 40 Neo भारतात 21 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे जो MediaTek Dimensity 7030 चिपसेटने सुसज्ज असेल. याशिवाय, हा फोन 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो, जो 68W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन 6.55-इंच लांबीचा FHD+ 144Hz कर्व OLED डिस्प्ले, 50MP ड्युअल कॅमेरा सिस्टम, 32MP सेल्फी कॅमेरा, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि IP68 रेटिंगसह येईल.
Redmi Note 13 सिरीज 21 सप्टेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे. टीझर्स आणि लीक्सनुसार, या लाइनअपमध्ये तीन मॉडेल्स नोट 13, नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो+ समाविष्ट असतील. हे तीन फोन एक वेगळ्या डिझाइन आणि अपग्रेड फीचर्ससह येतील. प्रो व्हेरियंटमध्ये 1800 निट्स पीक ब्राइटनेससह 1.5K OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. प्रो+ मॉडेलची स्क्रीन कर्व असेल आणि ती डायमेन्सिटी 7200-अल्ट्रा चिपसेटसह सुसज्ज असेल.
Honor Purse V या महिन्याच्या सुरुवातीला IFA 2023 मध्ये एक संकल्पना स्मार्टफोन म्हणून प्रदर्शित करण्यात आला होता. पण अलीकडे ब्रँडने पुष्टी केली आहे की, हा डिवाइस 19 सप्टेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च केला जाईल आणि खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, हे डिवाइसपेक्षा फॅशन ऍक्सेसरी म्हणून अधिक डिझाइन केलेले आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G SoC सह सुसज्ज असू शकतो.
लाँच 22 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये होणार आहे. हे उत्पादन टेनोचे पहिले क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये, रिंग कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक वर्तुळाकार कव्हर स्क्रीन प्रदान केली जाईल, ज्यामुळे त्याचे डिझाइन सर्वात खास होईल. लीक नुसार, या डिवाइस मध्ये 6.75-इंच 144Hz मेन डिस्प्ले, 1.39-इंच सेकंडरी स्क्रीन, MediaTek Dimensity 8050 chipset, 64MP मेन कॅमेरा आणि 45W चार्जिंग सपोर्ट असेल.