Upcoming Smartphones Launch: 2025 या नववर्षाचा दुसरा आठवडा स्मार्टफोन लाँचसाठी विशेष असणार आहे. भारतात या आठवड्यात अनेक बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या यादीमध्ये बजेट ते प्रीमियम श्रेणीचे फोन समाविष्ट आहेत. प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus, Oppo, Redmi, Moto इ. ब्रँडच्या स्मार्टफोन्स यात समाविष्ट आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
आगामी स्मार्टफोन Redmi 14C 5G भारतात उद्या 6 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. लक्षात घ्या की, हा कंपनीचा नवीनतम बजेट 5G स्मार्टफोन असणार आहे. लक्षात घ्या की, हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे होणार आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा डिस्प्ले असेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5160mAh बॅटरी असेल.
Motorola चा आगामी स्मार्टफोन Moto G05 फोन भारतात 7 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. हा फोनदेखील वरील फोनप्रमाणे प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. स्पेसिफिकेशन्स बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा मिळेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Mediatek G81 Extreme प्रोसेसर सारखे फीचर्स मिळणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus 13 सिरीज देखील 7 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या सिरीजअंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R फोन समाविष्ट असतील. या स्मार्टफोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध असणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, OnePlus 13R फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पुढील आठवड्यात लोकप्रिय कंपनी Oppo देखील Oppo Reno 13 सिरीज लाँच करणार आहे. हा फोन गुरुवारी 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता लाँच होणार आहे. या सीरिजअंतर्गत कंपनी Oppo Reno 13 आणि Oppo Reno 13R फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर मिळू शकतो. Oppo Reno 13 सिरीजमध्ये 50MP Sony IMX890 मुख्य कॅमेरा असेल. तसेच, 50MP JN5 टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा प्रदान केला जाऊ शकतो. तर, आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट कॅमेरामध्ये 50MP JN5 सेन्सर असेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.