Upcoming Smartphones This Week: भारतात 23 ते 30 सप्टेंबरपर्यंत भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स, पहा यादी

Updated on 23-Sep-2024
HIGHLIGHTS

सप्टेंबर 2024 सुरु झाल्यापासून अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत.

23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अनेक नवीन स्मार्टफोन लाँच केले जातील.

Samsung Galaxy M55S स्मार्टफोन 23 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

Upcoming Smartphones this week: 2024 चा सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. खूप आनंदाचा ठरला आहे. बहुप्रतीक्षित iPhone 16 सिरीजदेखील या महिन्यात लाँच करण्यात आली आहे. एंट्री लेव्हल डिव्हाइसेसपासून ते प्रीमियम फ्लॅगशिप फोनपर्यंत सर्व काही बाजारात लॉन्च केले गेले आहे. आता या महिन्याचा शेवटचा आठवडा देखील सुरु झाला आहे. होय, 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अनेक नवीन स्मार्टफोन लाँच केले जातील.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या आठवड्यात Samsung चा नवा प्रीमियम फोन, Tecno चा नवा बजेट स्मार्टफोन आणि Vivo V सिरीजचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात आगामी स्मार्टफोन्सची यादी-

Samsung Galaxy M55s 5G

Samsung Galaxy M55S स्मार्टफोन 23 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये दाखल होईल. लाँचपूर्वी या फोनबद्दल अनेक लीक पुढे आले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ sAMOLED+ डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. हा मोबाइल 50MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP OIS बॅक कॅमेराला सपोर्ट करेल. पॉवर बॅकअपसाठी, यात 5000 mAh बॅटरी मिळू शकते.

Tecno POP 9 5G

बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली Tecno कंपनी Tecno Pop 9 5G फोन भारतात 24 सप्टेंबर रोजी लाँच केला जाईल. कंपनीने सांगितले की, या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. Amazon लिस्टिंगमध्ये फोनचे अनेक स्पेक्स उघड करण्यात आले आहेत. TECNO POP 9 5G फोन HD+ स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच केला जाईल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा मोबाइल MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी यात 48MP कॅमेरा दिला जाईल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Vivo-V40e

Vivo V40e

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo V40e भारतात 25 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, V40 आणि V40 Pro नंतर या सिरीजमधील हा तिसरा स्मार्टफोन असणार आहे. लाँचपूर्वी या फोनबद्दल देखील अनेक लीक पुढे आले आहेत. या V40e मध्ये एक सेल्फीसाठी मजबूत 50MP फ्रंट देखील प्रदान करणार आहे. OIS + EIS फीचर्ससह 50MP AI कॅमेरा बॅक पॅनलवर उपलब्ध असेल. पॉवर बॅकअपसाठी, यात 5,500 mAh बॅटरी मिळेल. हा फोन देखील मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :