Upcoming Smartphones This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार जरबदस्त मिड बजेट स्मार्टफोन्स, पहा यादी

Upcoming Smartphones This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार जरबदस्त मिड बजेट स्मार्टफोन्स, पहा यादी
HIGHLIGHTS

या आठवड्यात 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान भारतात नवीन स्मार्टफोन लाँच होतील.

आगामी स्मार्टफोन्स 15 हजार ते 25 हजार रुपयांदरम्यान असणार आहेत.

Motorola Edge 50 Neo स्मार्टफोन 16 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल.

Upcoming Smartphones This Week: सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत भारतात अनेक नवे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, आणखी फोन्स लाँच करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या सज्ज झाल्या आहेत. होय, या आठवड्यात म्हणजेच 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मोबाईल मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर केले जातील. जे 15 हजार ते 25 हजार रुपयांदरम्यान असणार आहेत. पाहुयात यादी-

Also Read: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत देशी कंपनी LAVA चा स्वस्त स्मार्टफोन लाँच, मिळतील Powerful स्पेक्स

Motorola Edge 50 Neo

motorola edge 50 neo upcoming smartphones this week in india

Motorola Edge 50 Neo स्मार्टफोन 16 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola आपला नवीन फोन MIL810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आणि IP68 रेटिंगसह सादर करेल, अशी अपेक्षा आहे. हा फोन मजबूत बॉडीसह लाँच करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाइल मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेट आणि 8GB रॅमसह सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी 50MP चा रियर कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल. हा दोन 21,999 रुपये किमतीत सादर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Infinix Zero 40 5G

Infinix Zero 40 5G फोन भारतात येत्या 18 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाईल 12GB रॅम सह MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर वर काम करेल. फोटोग्राफीसाठी, मागील पॅनलवर 108MP बॅक कॅमेरा उपलब्ध असेल, तर समोर 50MP सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा मोबाइल 5,000 mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते.

HONOR 200 Lite

HONOR 200 Lite फोन येत्या 19 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. आकर्षक 50MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP बॅक कॅमेरासह हा फोन भारतात लाँच होणार आहे. हा फोन आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी Honor 200 Lite 5G फोन MediaTek Dimension 6080 चिपसेट वर काम करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 8GB RAM सोबत 8 GB व्हर्चुअल रॅम आहे. पॉवर बॅकअपसाठी, Honor 200 Lite मध्ये 4,500 mAh बॅटरी मिळेल, जी 35W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 25 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo