Upcoming Smartphones This Week: जुलै शेवटचा आठवडा आणि येत्या ऑगस्ट महिन्याचे सुरुवातीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात भारतीय मोबाइल बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. Realme 13 Pro सिरीज आणि Nothing Phone (2a) Plus सारखे बहुप्रतिक्षित स्मार्टफोन देखील लाँच केले जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती बघुयात-
Also Read: POCO F6 Deadpool Edition स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच, काय मिळेल विशेष? पहा किंमत
Oppo K12X 5G फोन भारतात 29 जुलै रोजी लाँच केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी आणि डबल पांडा ग्लासचे संरक्षण दिले जाईल. त्याबरोबरच, OPPO K12x 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा HD + 120Hz डिस्प्ले, 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, 45W फास्ट चार्जिंग आणि 5,100mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन बजेट रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. मात्र, फोनबद्दल योग्य माहिती फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
Realme Narzo N61 हा कमी बजेटचा मोबाइल असेल, जो आज 29 जुलै रोजी 12,000 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो. हा Realme स्मार्टफोन ArmorShell प्रोटेक्शन सह येईल. यात 5,000 mAh बॅटरी आणि IP54 रेटिंग असेल असे कंपनीने म्हटले आहे. लीकनुसार, या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील असेल.
Realme 30 Pro सिरीज उद्या 30 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे. या फोनचे ‘प्रो’ मॉडेल 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये, Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो. तर, फोटोग्राफीसाठी 50MP+50MP बॅक कॅमेरासह 32MP सेल्फी कॅमेरा प्रदान केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी असेल, अशी माहिती मिळाली आहे.
Realme 13 Pro Plus 5G फोन वरील फोनसह उद्या भारतात लाँच होणार आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 7S Gen 2 octacore प्रोसेसर दिला जाईल. ज्यासह फोनमध्ये 12 GB रॅम दिली जाईल. हा मोबाईल 3D VC कूलिंग सिस्टमने सुसज्ज असेल आणि 5,200 mAh बॅटरीला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवर दोन 50MP Sony सेन्सर असतील. हा फोन मिड बजेटमध्ये सादर केला जाईल.
Nothing Phone (2A) Plus हा MediaTek Dimensity 7350 Pro चिपसेटवर लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. 31 जुलै रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत प्रवेश करेल. नथिंग ब्रँडचा हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल मोबाइल असेल, ज्यामध्ये 12GB रॅम देखील असेल. फोनमध्ये 50 MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.
Poco M6 Plus भारतात 1 ऑगस्ट रोजी लाँच केला जाईल, जो कदाचित रीब्रँड केलेला Redmi 13 5G असेल. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 AE चिपसेटवर लाँच केला जाईल. त्याबरोबरच, POCO M6+ 5G मध्ये 108MP चा बॅक कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा असेल. हा POCO स्मार्टफोन 6.79 इंच लांबीच्या 120Hz LCD डिस्प्ले, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,030 mAh बॅटरीसह येऊ शकतो.