Upcoming Smartphones in India: पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स, पहा यादी

Upcoming Smartphones in India: पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स, पहा यादी
HIGHLIGHTS

भारतीय बाजारपेठेत एकामागून एक नवीन स्मार्टफोन दाखल होण्यास सज्ज

Redmi A4 स्मार्टफोन भारतात 20 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे.

Realme GT 7 Pro मध्ये अंडरवॉटर फोटोग्राफी मोड दिला जाईल.

Upcoming Smartphones in India: सध्या भारतीय बाजारात अनेक बहुप्रतिक्षित स्मार्टफोन्सची प्रतीक्षा आणि चर्चा सुरु आहे. त्यामुळे स्मार्टफोन लॉन्चसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पुढील दोन्ही आठवड्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत एकामागून एक नवीन स्मार्टफोन दाखल होण्यास सज्ज झाले आहेत. Realme, Oppo आणि Redmi सारख्या कंपन्या या महिन्यात त्यांचे प्रीमियम आणि बजेट फोन भारतात लाँच करणार आहेत. जाणून घेऊयात भारतात नोव्हेंबरमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-

Redmi A4

redmi a4 upcoming smartphones in india

Redmi A4 स्मार्टफोन भारतात 20 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. Redmi चा नवा फोन कंपनीचा परवडणारा 5G स्मार्टफोन असेल, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल. तुम्ही हा फोन कंपनीच्या साइट आणि Amazon वरून खरेदी करण्यास सक्षम असाल. या साईट्सच्या माध्यमातून फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर देखील आले आहेत. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Snapdragon 4s gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा दिला जाईल. तर, फोनमध्ये 5160mAh बॅटरी मिळणार आहे.

Oppo Find X8 Series

Oppo Find X8 सिरीजची भारतीय लाँच डेट कंपनीने काल म्हणजेच सोमवारी जाहीर केली आहे. या सिरीजचे भारतीय लाँच 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. या सिरीजअंतर्गत Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro हे दोन फोन लाँच केले जातील. या फोनमध्ये पर्ल व्हाइट आणि स्पेस ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Realme GT 7 Pro

Realme GT7 Pro launching as india's first under water mode camera

अनेक कालावधीपासून Realme च्या आगामी Realme GT 7 Pro ची चर्चा आणि प्रतीक्षा भारतीय बाजारात सुरु आहे. Realme GT 7 Pro स्मार्टफोन भारतात 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. हा फोन कंपनीच्या साइट आणि Amazon वर खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात येईल. तसेच, या फोनची समर्पित मायक्रोसाइट दोन्ही साइट्सवर लाइव्ह झाली आहे. याद्वारे फोनचा लुक आणि फीचर्स समोर आले आहेत. हा फोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज असेल. वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP69 रेटिंग असेल. विशेष म्हणजेच फोनमध्ये अंडरवॉटर फोटोग्राफी मोड दिला जाईल, जो तुम्हाला पाण्याखाली फोटोग्राफीचा अनुभव देईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo