2024 म्हणजेच नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्ही एक नवीन आणि लेटेस्ट Smartphones खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडा धीर धरा. कारण येत्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये भारतात अनेक स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यामध्ये OnePlus, Xiaomi, Samsung आणि Vivo ब्रँडचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात आगामी स्मार्टफोन्सची यादी-
आगामी Xiaomi Redmi Note 13 सिरीज 4 जानेवारी 2024 रोजी भारतीय बाजारात लाँच केली जाईल. या सिरीजअंतर्गत Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus लाँच केले जातील. फोनमध्ये 6.67 इंच 1.5K OLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. यामध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर सपोर्ट असेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येईल.
OnePlus 12 मध्ये 6.82 इंच 2K AMOLED डिस्प्ले असेल. फोन Snapdragon 8 Gen 3 सपोर्ट सह येईल. तसेच, चार्जिंगसाठी 100W फास्ट वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. तुम्हाला फोनमध्ये 5400mAh बॅटरी दिली जाईल. फोन 50MP वाइड अँगल आणि 48MP अल्ट्रावाइड सोबत 64MP टेलीफोटो लेन्स सपोर्टसह येईल. OnePlus 12 स्मार्टफोन 23 जानेवारी 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे.
OnePlus 12R सीरीज भारतात नवीन वर्षात लाँच केला जाईल. हा भारतातील विशिष्ट फोन असेल, असा दावा केला जात आहे की. फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स अद्याप लीक झालेले नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन OnePlus 12 सह 23 जानेवारी 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे.
Samsung Galaxy S24 Series ही टेक विश्वातील बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सिरीज आहे. मागील Samsung Galaxy S23 सिरीज भारतात अधिक लोकप्रिय झाली होती. हे स्मार्टफोन सिरीज टेक विश्वात 24 जानेवारी 2024 रोजी लाँच करण्यात येणार आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट सह येईल. सॅमसंगकडून यामध्ये नवीन Galaxy AI स्मार्ट फीचर प्रदान केले जाईल.
Vivo चे आगामी स्मार्टफोन्स Vivo X100 Pro आणि X100 देखील जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाईल. नवीन MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर फोनमध्ये सपोर्ट असेल. यात 50MP 1-इंच IMX989 VCS बायोनिक सेन्सर असेल. तसेच, 150 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 50MP पेरिस्कोपिक लेन्ससह 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा प्रदान केला जाईल. हे 100x डिजिटल झूमसह प्रदान केले जाईल. तसेच, 3x ऑप्टिकल झूम समर्थित केले जाऊ शकते.