Upcoming Smartphones in November 2024: भारतात लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा होणार वर्षाव, पहा यादी

Updated on 29-Oct-2024
HIGHLIGHTS

नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होणार अनेक नवीनतम फ्लॅगशिप्स स्मार्टफोन्स

Realme GT 7 Pro हा भारतात लाँच होणारा Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर असलेला पहिला फोन असेल.

बहुप्रतीक्षित Vivo X200 सिरीज नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते.

Upcoming Smartphones in November 2024: भारतात पूर्वीपासून अनेक लोक विशेषतः दिवाळीच्या सणाला मोठ्या आणि महागड्या वस्तू खरेदी करतात. तसेच, टेक विश्वात देखील दिवाळीनिमित्त नवे प्रोडक्ट्स लाँच होतात किंवा सर्व प्रोडक्ट्सवर भारी ऑफर्स जारी केले जातात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला भारतात लाँच होणाऱ्या नवीनतम स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. अनेक मोठ्या स्मार्टफोन निर्माता नोव्हेंबरमध्ये नवीन फोन आणत आहेत. यामध्ये फ्लॅगशिप्स स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. पाहुयात यादी-

Realme GT 7 Pro

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme GT 7 Pro हा भारतात लाँच होणारा Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर असलेला पहिला फोन असेल. या फोनच्या आगमनाने बाजारपेठेत परफॉर्मन्समध्ये स्पर्धा निर्माण होईल. Realme GT 7 Pro 16 GB रॅमने समर्थित असेल. या फोनमध्ये 6500mAh बॅटरी, 120W चार्जिंग, 8T LTPO OLED स्क्रीन आणि AI पॉवर असेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Redmi 14C 5G

Redmi 14C 5G फोन भारतात पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. परफॉर्मन्ससाठी हा मोबाईल Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे ज्यात 8GB रॅम असेल. लीकनुसार, Redmi 14C 5G फोनमध्ये 6.88-इंच लांबीचा HD+ 120Hz डिस्प्ले असू शकतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी सेन्सर मिळेल. यात 5,060 mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

iQOO 13

रिपोर्ट्स आणि लीक्स नुसार, आगामी IQOO फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिले जाऊ शकते. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 120W चार्जिंगसह 6,150mAh बॅटरीसह येऊ शकतो. त्याबरोबरच, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाने सुसज्ज कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, iQOO 13 देखील स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर देखील लॉन्च केला जाईल, जो नोव्हेंबर महिन्यात भारतात दाखल होईल.

Vivo X200

Vivo X200 सिरीज भारतात नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. लीकांनुसार, Vivo X200 च्या अपेक्षित फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत: प्रोसेसिंगसाठी, यात MediaTek डायमेंसिटी 9400 चिपसेट देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या मोबाइलमध्ये 90W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,800 mAh बॅटरी आहे. तर, फोटोग्राफीसाठी, यात 50 MP + 50 MP + 50 MP रियर कॅमेरा आणि 32 MP सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo X200 Pro

Vivo X200 सिरीजमध्ये Vivo X200 Pro फोनदेखील लाँच होणार आहे. लीकनुसार, या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे आहेत: या फोनमध्ये 6.78 इंच 8T LTPO AMOLED स्क्रीन आहे. प्रक्रियेसाठी, यात MediaTek Dimensity 9400 octa-core प्रोसेसर आहे. Vivo चा कॅमेरा या मोबाईलमध्ये 200MP Samsung HP9 Zeiss + 50MP Sony LYT-818 + 50MP अल्ट्रा-वाइड रियर आणी 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी यात 90W वायर्ड + 30W वायरलेस चार्जिंगसह सुसज्ज 6,000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :