2024 चा एप्रिल महिना आता संपत आला आहे. या महिन्यात भारतात जवळपास डझनभर स्मार्टफोन लाँच केले गेले आहेत. त्यानंतर, आता पुढील महिन्याची सुरुवात होणार आहे. कमी बजेटच्या स्वस्त Smartphones पासून ते महागडे मोबाईल्स मे महिन्यात भारतात लाँच होणार आहेत. पुढील आठवड्यात 29 एप्रिल ते 6 मे दरम्यान अनेक Vivo फोन लाँच होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या स्मार्टफोनची कन्फर्म आणि अपेक्षित लाँच डेट देखील उघड झाली आहे.
हे सुद्धा वाचा: भारीच की! HMD चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, ब्रँडने शेअर केले डिटेल्स। Tech News
Vivo V30e भारतात 2 मे रोजी लाँच होणार आहे. अपेक्षित स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अल्ट्रा स्लिम 3D कर्व डिस्प्ले मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Vivo V30e 5G फोन 50MP सेल्फी कॅमेरासह लाँच केला जाईल. फोनच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेल Sony IMX882 पोर्ट्रेट सेन्सर प्रदान केला जाईल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,500 mAh बॅटरी दिली जाईल.
Vivo Y18 पुढील आठवड्यात भारतीय बाजारात लाँच होऊ शकतो. या फोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये असू शकते. यावरून समजलेच असेल की, हा फोन कंपनीच्या बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात येईल. या फोनमध्ये 4 GB रॅम सह MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी मोबाईलमध्ये 5,000 mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
वरील स्मार्टफोन Vivo Y18 सोबत कंपनी भारतीय बाजारात आणखी एक कमी बजेट स्मार्टफोन Y18E लाँच करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये असेल. या फोनमध्ये 6.56 इंच लांबीची 90Hz HD स्क्रीन मिळेल. फोटोग्राफीसाठी 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी सेन्सर पाहता येईल. हा मोबाईल MediaTek Helio G85 प्रोसेसरवर देखील काम करेल आणि 4 GB रॅमला सपोर्ट करेल, असे सांगितले जात आहे.