Upcoming Smartphones in March 2024: Samsung पासून Nothing पर्यंत Powerful स्मार्टफोन्स होणार लाँच, बघा यादी। Tech News
मार्च 2024 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन भारतात होणार लाँच
Realme 12+ भारतात 6 मार्च 2024 रोजी लाँच होणार आहे.
5 मार्च रोजी Nothing Phone (2a) भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज
स्मार्टफोन निर्माता कंपन्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहे. पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये अनेक नवीन Smartphones भारतीय बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन स्मार्टफोन्स प्रगत तंत्रज्ञानापासून ते आकर्षक डिझाइनपर्यंत आहेत. या यादीमध्ये Nothing Phone (2a), Samsung Galaxy A55 5G, Realme 12+ 5G आणि Vivo V30 Pro यांचा समावेश आहे. चला तर बघुयात आगामी स्मार्टफोन्सची यादी-
Realme 12+ 5G
Realme 12+ भारतात 6 मार्च 2024 रोजी लाँच होणार आहे. Realme 12+ मध्ये FHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोन Dimensity 7050 SoC ने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी कॅमेरा सेटअपसाठी यात मागील बाजूस 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी 5,000mAh बॅटरी आहे जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Nothing Phone (2a)
Nothing लवकरच 5 मार्च रोजी Nothing Phone (2a) भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Nothing Phone (2a) मध्ये 6.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. सुरळीत कामकाजासाठी हा स्मार्टफोन MediaTek Dimension 7200 Ultra प्रोसेसरसह येईल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस (2a) 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
Vivo V30 Pro
Vivo 28 फेब्रुवारी म्हणजे आज Vivo V30 Pro बाजारात लाँच करणार आहे. Vivo V30 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व डिस्प्ले असेल. Vivo V30 Pro मध्ये 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असेल. हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज असेल. हा फोन ग्रीन सी, नाईट स्काय ब्लॅक आणि पर्ल व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल.
Samsung Galaxy A55 5G
Samsung मार्च किंवा एप्रिल महिन्यात Samsung Galaxy A55 5G टेक विश्वात लाँच करणार आहे. या वर्षीचा फ्लॅगशिप A-सिरीज स्मार्टफोन Samsung Galaxy A55 असण्याची शक्यता आहे. Galaxy A55 मध्ये तीन उंच कॅमेरा रिंग्ससह फ्लॅट बॅक आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा स्मार्टफोन Exynos 1480 SoC प्रोसेसरने सुसज्ज असेल. हा फोन Android 14 वर आधारित One UI 6.1 वर कार्य करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile