Upcoming Smartphones in July 2024: भारतात CMF पासून ते Samsung पर्यंत जबरदस्त स्मार्टफोन्स होणार लाँच, बघा यादी
Motorola Razr 50 Ultra फोन भारतात 4 जुलै रोजी लाँच केला जाईल.
Nothing चा सब-ब्रँड CMF भारतात आपला पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 जुलैमध्ये लाँच करणार आहे.
Samsung ने नुकतेच आपल्या सर्वात मोठ्या सॅमसंग Unpacked Event ची घोषणा केली आहे.
Upcoming Smartphones in July 2024: जुलै 2024 मध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मार्टफोन्स कंपन्या आपले आगामी स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या महिन्यात, नथिंगचा सब-ब्रँड CMF भारतात आपला पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 लाँच करणार आहे. एवढेच नाही तर, यासोबत Samsung ची बहुप्रतिक्षित फोल्डेबल फ्लिप सीरीज देखील लवकरच भारतात लाँच केली जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात जुलै महिन्यात भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: Price Cut! लेटेस्ट Samsung 5G फोनवर तब्बल 6000 रुपयांची कपात, पॉवरफुल फीचर्स उपलब्ध
Motorola Razr 50 Ultra
Motorola Razr 50 Ultra फोन भारतात 4 जुलै रोजी लाँच केला जाईल. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप फ्लिप फोन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Moto AI सारख्या दमदार फीचर्ससह भारतात एंट्री करणार आहे. ज्यामध्ये Photomoji, Magic Canvas, Style Sync, Action Shot, Adaptive Stabilization आणि Horizontal lock सारखे अनेक फीचर्स तुम्हाला मिळतील.
CMF Phone 1
Nothing चा सब-ब्रँड CMF चा पहिला वहिला स्मार्टफोन अखेर भारतात लाँच होणार आहे. CMF Phone 1 असे नव्या फोनला नाव देण्यात आले आहे. हा फोन भारतात 8 जुलै रोजी लाँच होणार आहे, अशी पुष्टी कंपनीने केली आहे. यासोबतच कंपनी CMF Buds Pro 2 आणि CMF Watch Pro 2 देखील सादर करणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
Redmi 13 5G
Redmi 13 5G फोनही भारतात जुलैमहिन्यात लाँचसाठी सज्ज झाला आहे. हा फोन 9 जुलै रोजी भारतात दाखल होईल. लेटेस्ट स्मार्टफोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन क्रिस्टल ग्लास डिझाइनसह येणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी 108MP कॅमेरा उपलब्ध असेल.
Samsung Galaxy Z Fold 6 and Flip 6
Samsung ने नुकतेच आपल्या सर्वात मोठ्या सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंटची घोषणा केली आहे. 10 जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान, कंपनी आपले पुढील पिढीचे फोल्डेबल आणि फ्लिप फोन सादर करू शकते, ज्यामध्ये Samsung Galaxy Z Fold 6 आणि Flip 6 फोन समाविष्ट असतील. याव्यतिरिक्त, Galaxy Ring, Galaxy Watch Ultra आणि Galaxy Watch 7 मालिका उत्पादने देखील सादर केली जाऊ शकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile